‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क फोर्स ः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर 

अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्धारित केलेल्या नागरिकांकरिता द्यावयाच्या अत्यावश्यक सेवा, सुविधांवर नियंत्रण ठेवून त्यांचे नियमन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा प्रशासनाची टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीत एकूण ११ अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांनी नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्धारित केलेल्या नागरिकांकरिता द्यावयाच्या अत्यावश्यक सेवा, सुविधांवर नियंत्रण ठेवून त्यांचे नियमन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा प्रशासनाची टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीत एकूण ११ अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांनी नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

या समितीत अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याकडे आरोग्य विभागाशी संबंधित आराखडा तयार करून जिल्हा आरोग्य यंत्रणेचे समन्वय, रक्ताची उपलब्धता, औषध पुरवठा सुरळीत राखून साठेबाजी रोखणे, खाजगी दवाखाने सुरु ठेवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कलम १४४ च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पोलीस दलाशी समन्वय, वाहने अधिग्रहण, मंत्रालयाशी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचलन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले व जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल वितरण, गॅस सिलिंडर उपलब्धता, शिवभोजन योजनेची अंमलबजावणी आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. 

रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्याकडे सेवाभावी संस्थांचे व्यवस्थापन, घर कामगार, ऑटो रिक्षाचालक, खाजगी वाहन चालक आदींबाबतचे प्रश्न व व्यवस्था, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार यांच्याकडे वाहतूक व्यवस्था, कामगारांसंदर्भातील प्रश्न, उपजिल्हाधिकारी महसूल यांच्याकडे कृषी विषयक बाबी, पाणी व वीज पुरवठा, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड यांच्याकडे विविध विभागांशी समन्वय राखून माहिती संकलन करणे, जनसंपर्क अधिकारी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी माध्यमांशी समन्वय राखून जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती माध्यमांना देणे, प्रसिद्धीबाबत उपाययोजना करणे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्रीमती टवलारे यांनी नगरपालिका क्षेत्रातील उपाययोजनांचे नियमन करणे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी नितीन चौधरी जिल्हा संपर्क यंत्रणा सुरळीत ठेवणे याप्रमाणे जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या टास्क फोर्सचे काम सुरु झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com