Farmers Agricultural News Marathi urea shortage in district Gondia Maharashtra | Agrowon

गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाई

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

गोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून युरियाला मागणीही वाढली आहे. अशातच जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने आता शेतकऱ्यांना युरिया टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी जिल्ह्यात उपलब्ध खताची जादा दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

गोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून युरियाला मागणीही वाढली आहे. अशातच जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने आता शेतकऱ्यांना युरिया टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी जिल्ह्यात उपलब्ध खताची जादा दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

जिल्ह्यात यावर्षी १ लाख ८९ हजार हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन आहे. परंतु जून महिन्यात पावसाने खंड दिल्याने धान रोवणीच्या कामावर परिणाम झाला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात रोवणीयोग्य पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांनी धान रोवणीच्या कामांना गती दिली. रोवणीच्यावेळी शेतकऱ्यांकडून युरियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र ऐन रोवणीच्यावेळीच बाजारातून युरिया गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. युरिया खताची रॅक आली नसल्याचे कारण यामागे दिले जात आहे. 

विशेष म्हणजे ज्या विक्रेत्यांकडे युरिया उपलब्ध आहे ते शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जादा दराने युरियाची विक्री करीत आहेत. कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यासाठी १४ हजार ४०५ टन युरियाची मागणी नोंदवण्यात आली होती. त्यापैकी आजवर ९ हजार ७४३ टन युरियाचा पुरवठा झाला आहे. दरम्यान येत्या आठवड्यात जिल्ह्याला युरियाचा पुरवठा होईल. त्याकरिता लवकरच रॅक लागणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

अशी आहे खतांची मागणी (कंसात पुरवठा, मेट्रिक टन)  

  • युरिया : १,४४,०४५ (९७४३)
  • डीएपी : १३६४ (५६९)
  • सिंगल सुपर फॉस्फेट  : ६२८ (२०८३)
  • एमओपी : २५२ (१४२)
  • संयुक्त खते : ८३०५ (१४७७२)

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...