Farmers Agricultural News Marathi vegetables dump in trash Satara Maharashtra | Agrowon

कऱ्हाडमध्ये विक्रीअभावी शेतीमाल कचरापेटीत

हेमंत पवार
रविवार, 12 एप्रिल 2020

शेतकऱ्यांचा कोणीच वाली नाही अशी सद्यःस्थिती आहे. शेतकरी शेतीमाल घेऊन गेल्यानंतर त्यांचा माल विकलाच गेला पाहिजे. यासाठी शासनाने उपाययोजना करावी. तरच शेतकरी या संकटातून तरेल, अन्यथा त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येईल. 
- शंकरराव खोत, कृषिभूषण शेतकरी, वाजेवाडी

कऱ्हाड, जि.सातारा ः शेतकऱ्यांनी चार-सहा महिने मोठ्या कष्टाने पिकवलेला भाजीपाला पदरमोड करून विक्रीसाठी कऱ्हाड बाजारात आणला. मात्र लॉकडाउनमुळे त्यापैकी काही शेतमाल विकलाच गेला नाही. अगोदरच बाजारापर्यंत शेतीमाल आणताना वाहनांसाठी झालेली पदरमोड भरून काढायची पंचाईत असताना पुन्हा तो माल उचलून दुसरीकडे विक्रीसाठी नेणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल कचरापेटीत, रस्त्यावर फेकून देत घर गाठावे लागले. चार पैसे मिळायच्या हंगामातच लॉकडाउन झाल्याने शेतकऱ्यांवर मोठी आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे.  

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. परिणामी सर्वच बंद राहिल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्या आर्थिक गर्तेत शेतकरीही सापडले आहेत. सध्याच्या हंगामात पालेभाज्या आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो. गावोगावच्या जत्रा-यात्रा, लग्न, उत्सव, सण असल्याने या कालावधीत त्याला मागणीही मोठी असते. त्यादृष्टीने शेतकरी दरवर्षी नियोजन करतात. सध्या शेतांमध्ये शेतीमालही चांगला आला आहे. मात्र त्याच्या विक्रीलाच ग्रहण लागले आहे.

सरकारने शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी आणण्याकरिता मुभा दिली आहे. त्यानुसार शेतकरी पदरमोड करून भाडेपट्टीने वाहन करून शेतमाल विक्रीसाठी मार्केटला आणत आहेत. मात्र तेथेही पहिल्यासारखी मागणी नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला माल विकला जाईलच याची खात्रीच नाही. त्यातच बाजारापर्यंत शेतीमाल नेण्यासाठी भाडेपट्टीने वाहन करावे लागते. त्यासाठी केलेली पदरमोड अंगावर असताना शेतीमाल विक्री झाला नाही म्हणून दुसऱ्या वाहनाने पुन्हा दुसरीकडे भाजीपाला नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. परिणामी मार्केटमध्ये आणलेला शेतमाल अनेक शेतकरी कचरापेटी, रस्त्यांवर फेकून देत घरी निघून जात आहेत. 

शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेला सर्वच शेतीमाल विकला जात नाही. त्यामुळे काहीजण तो कचरापेटीत टाकून घराकडे जात आहेत. काही जण त्या परिसरातील रस्त्यावरच तो टाकत आहेत. त्यातच शहर व परिसरातील काही जनावरे, पाळीव प्राण्यांना चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये भाजीपाला पडला आहे याची माहिती मिळाल्यावर ज्यांच्याकडे जनावरे आहेत, मात्र चारा उपलब्ध नाही असे काहीजण संबंधित ठिकाणावरून भाजीपाला भरून नेऊन जनावरांना घालत आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...