Farmers Agricultural News Marathi Veterinary Clinic is wating for inauguration Sangli Maharashtra | Agrowon

आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे जनावरांच्या उपचारासाठी जिल्हा पशुसंवर्धन योजनेअंतर्गत सुमारे ४१ लाख रुपये खर्चून पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यात आला आहे. बांधकाम पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी या दवाखान्याचे उद्‌घाटन झालेले नाही. त्यामुळे या दवाखान्याचे उद्‌घाटन होऊन तो कधी सुरू होईल असा सवाल पशुपालक करीत आहेत. 

आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे जनावरांच्या उपचारासाठी जिल्हा पशुसंवर्धन योजनेअंतर्गत सुमारे ४१ लाख रुपये खर्चून पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यात आला आहे. बांधकाम पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी या दवाखान्याचे उद्‌घाटन झालेले नाही. त्यामुळे या दवाखान्याचे उद्‌घाटन होऊन तो कधी सुरू होईल असा सवाल पशुपालक करीत आहेत. 

परिसरातील आळसंद, बलवडी (भा.), तांदळगाव, खंबाळे (भा.), कार्वे, वाझर, जाधवनगर, कमळापूरसह नऊ गावांतील अकरा हजार लहान मोठ्या जनावरांना या दवाखान्याचा फायदा होणार आहे. आमदार अनिल बाबर व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. ताकारी आरफळ योजनेचे पाणी आले आहे. बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जनावरांच्या संख्येतही वाढ झाली. शेतीला आधार म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. किंबहुना अनेक शेतकरी दुग्धोत्पादन व्यवसाय म्हणून करीत आहेत. जनावरांचे संगोपन करण्याकडे कल वाढला आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांप्रमाणे शेळ्या - मेंढ्या कोंबड्यांना हा दवाखाना फायदेशीर ठरणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन योजनेअंतर्गत बांधलेल्या दवाखान्याचा परिसरातील जनावरांवर उपचारासाठी फायदा होईल, असे पशुसंवर्धन अधिकारी  ए. वाय. रेवघडे यांनी सांगितले.

इमारतीला वादाची किनार 
आळसंद येथे उभारलेल्या पशुवैद्यकीय दवाखानाच्या इमारतीला पदाधिकाऱ्यांतील अंतर्गत वादाची किनार आहे. सरपंच व समर्थक सदस्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जुन्या इमारतीच्या जागी व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घातला होता. वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केला. परंतु, यश आले नाही. दुसऱ्या गटाने पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्याचा निर्णय घेतला. तो पूर्णही केला.


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...