Farmers Agricultural News Marathi viral disease on tomato Satara Maharashtra | Agrowon

साताऱ्यातील बहुतांश भागात टोमॅटोवर विषाणूजन्य रोग

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

माझे सध्या अडीच एकर क्षेत्रावर टोमॅटोचे पीक आहे. यामध्ये ३० गुंठे क्षेत्रावरील टोमॅटो सुरू आहे. या बहुतांशी पिकात विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यातच गारांसह झालेला पाऊस आणि सध्या सुरू असलेला लॅाकडाउन यामुळे विक्री करणेही अवघड झाले आहे.
- दादासाहेब चव्हाण, टोमॅटो उत्पादक शेतकरी, कोपर्डे हवेली, जि. सातारा.

सातारा-ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॅाकडाउनमुळे शेतकरी संकटात असताना आता टोमॅटोवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यात वाढ झाली आहे. हजारो हेक्टरवरील टोमॅटो पीक विषाणूजन्य रोगाच्या विळख्यात सापडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी टोमॅटोची लागवड केली जाते. यामध्ये फलटण, कोरेगाव, कऱ्हाड, खंडाळा, वाई तालुक्यात टोमॅटोचे पिक घेतले जाते. पाण्याची उपलब्धतता चांगली असल्याने या हंगामात तीन हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असल्याचा अंदाज आहे. फळे सुरू असतानाच टोमॅटोवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. यामध्ये फळे पिवळी होणे, आकार वेडावाकडा होणे, कापसासारखा मऊ होणे आदी प्रकाराची लक्षणे दिसत आहे. बाधित फळांच्या छायाचित्रावरून हा सीएमव्ही असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मात्र, शास्त्रीय परीक्षण केल्यानंतरच अधिकृत निदान होणार आहे. भविष्यात निदान होईलही मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान सुरूच राहणार आहे. जिल्ह्यातील टोमॅटोच्या बहुतांशी प्लॅाटवर या विषाणूचा कमी अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगितले जात आहे. टोमॅटो प्लॅाट कोणत्या स्टेजला आहे यावर नुकसानीचे आकडे कमी जास्त होणार असले तरी किमान ५० टक्क्यांवर नुकसान ग्राह्य धरले तरी कोट्यावधी रुपयांचा फटका बसणार आहे. टोमॅटोत वापरली जात असलेली सुतळी तसेच अवजारांमुळे या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे बोलले जात आहे.

‘कोरोना’मुळे लॅाकडाउन सुरू असल्यामुळे टोमॅटाची अपेक्षित विक्री होत नसून किलोला आठ रुपये दर हा देखील परवडत नाही. तरी शेतकरी लॅाकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर विक्री करता येईल या आशेवर टोमॅटोचे संगोपन करीत आहेत. मात्र या विषाणूजन्य रोगामुळे शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. फळाचे आकार, रंग यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडण्याबरोबर फळे खराब होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांना हा रोग नीट समजत नसल्यामुळे फवारणीचा खर्च वाढला आहे.

या संदर्भात कृषी विभागाशी संपर्क केला असता अजूनही शेतकऱ्यांकडून याबाबत कोणताही तक्रार अर्ज आला नसल्याचे सांगण्यात आले. या विषाणूजन्य रोगाचा वेळेत बंदोबस्त न झाल्यास भविष्यात टोमॅटोच्या क्षेत्रात घट होणार आहे.

 प्रादुर्भाव झालेल्या टोमॅटो पिकाची पाहणी करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. प्रत्यक्ष पाहणी केल्यावर तज्ज्ञांकडे माहिती पाठवली जाईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  महेश झेंडे यांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...