म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी वसूल

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चला सुरू झाले. सुमारे चार महिने हे आवर्तन चालू राहिले. या चार महिन्यांतील वीजबिल १४ कोटी तर पाणीपट्टी २ कोटी ६६ लाख रुपये झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चला सुरू झाले. सुमारे चार महिने हे आवर्तन चालू राहिले. या चार महिन्यांतील वीजबिल १४ कोटी तर पाणीपट्टी २ कोटी ६६ लाख रुपये झाली आहे. चार तालुक्यांतून आजअखेर २ कोटी १ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले. यामुळे दुष्काळग्रस्त पट्ट्यात पाणीटंचाई भासली नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून प्रत्येक आवर्तनासाठी सुमारे ८ ते १० टीएमसी पाणी उचलून दुष्काळग्रस्त भागात दिले जाते. परंतू या उन्हाळी आवर्तनासाठी अवघे ३.८ टीएमसी पाणी उचलण्यात आले होते. गतवर्षी दुष्काळग्रस्त पट्ट्यात दमदार पाऊस झाला. यामुळे बहुतांश भागात पाण्याची पातळी कमी झाली नव्हती. त्यातच वळवाचा पाऊसदेखील चांगला झाला. यामुळे पाण्याची मागणी कमी होती. परिणामी ५ ते ७ टीएमसी पाणी कमी लागले. यामुळे वीजबिलाचा भारदेखील कमी झाला.

दरम्यान, सिंचनासाठी ९० दिवसांत लाभक्षेत्रातील मिरज तालुक्यात १००४.८५, कवठेमहांकाळ तालुक्यात ५४४.७४, तासगाव तालुक्यात १५३.९४ तर जत तालुक्यात सर्वाधिक १४९३.४५ दशलक्ष घनफूट पाणी वितरित करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात वेळेत पाणी मिळाले असल्याने टंचाई भासली नाही.

या ९० दिवसांचे शासनाच्या नवीन धोरणानुसार वीजबिल ११ कोटी ३४ लाख तर पाणीपट्टी २ कोटी ६६ लाख रुपये झाली आहे. या नवीन धोरणानुसार २ कोटी १ लाख पाणीपट्टी वसुली झाली आहे. उर्वरित पाणीपट्टी वसुलीचे काम सुरू आहे. उन्हाळी आवर्तनातील पाणीपट्टी पूर्ण वसूल होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.  

तालुकानिहाय वसूल झालेली पाणीपट्टी (रुपये)
मिरज   १ कोटी ४ लाख
तासगाव २३ लाख ७९
कवठे महांकाळ ३६ लाख ३४ हजार
जत  ३६ लाख ९२ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com