उजनी धरण दोन दिवसांत प्लसमध्ये येणार

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रात पावसाची अधून-मधून हजेरी होत असल्याने दौंडकडून धरणाकडे पाण्याचा विसर्ग कमी, पण अखंडपणे सुरू आहे. परिणामी, उणे पातळीत गेलेले धरण येत्या दोन दिवसांत प्लसमध्ये येण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणातील साठा उणे १.६२ टक्केवर आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रात पावसाची अधून-मधून हजेरी होत असल्याने दौंडकडून धरणाकडे पाण्याचा विसर्ग कमी, पण अखंडपणे सुरू आहे. परिणामी, उणे पातळीत गेलेले धरण येत्या दोन दिवसांत प्लसमध्ये येण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणातील साठा उणे १.६२ टक्केवर आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे धरणातील पाण्याकडे असतातच, पण सोलापूर शहरासह या परिसरातील १२५ हून अधिक नळपाणी योजनाही धरणाच्या पाण्यावर अवलंबून असतात. त्यामुळे सर्वांचेच लक्ष धरणातील पाणीसाठ्यावर असते. विशेषतः रब्बी हंगामासह या कालावधीतील ऊसलागवड व अन्य फळबागासाठी धरणातील पाण्याचा उपयोग होतो. किंबहुना धरणातील पाण्यावरच त्याच्या लागवडीचे नियोजन होते. पंढरपूर, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस या तालुक्‍यांना धरणातील पाण्याचा सर्वाधिक फायदा होतो. गेल्यावर्षीही धरण जवळपास शंभर टक्के भरले, पण त्याचा वापरही तेवढाच झाला. सध्याही नियोजनानुसार उन्हाळी पाळ्या पूर्ण झाल्या. पण काही तीन महिन्यांपूर्वी धरणाची पाणी पातळी उणे २६ टक्‍क्‍यांपर्यंत पोचल्याने चिंता व्यक्त होत होती. पण धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या १४ धरणक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस होतो आहे. 

अलीकडच्या काही दिवसांत त्यात जोर नसला, तरी त्यात सातत्य आहे. पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे हे पाणी पुढे दौंडकडून उजनी धरणाकडे सोडले जात आहे. सध्या २४७० क्‍युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणाची सध्या उणेमध्ये गेलेली पाणी पातळी प्लसमध्ये येणार आहे. सध्या प्लसमध्ये जाण्यासाठी फक्त उणे १.६२ टक्के पाणीसाठा कमी आहे. येत्या दोन दिवसांत तोही पूर्ण होईल, अशी स्थिती आहे.   धरणातील बुधवारची पाणी पातळी 

  • एकूण पाणीपातळी : ४९०.९०५ मीटर
  • एकूण पाणीसाठा : ६२.८० टीएमसी
  • उपयुक्त साठा : उणे ०.८७ टीएमसी
  • टक्केवारी : उणे १.६२ टक्के
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com