Farmers Agricultural News Marathi water supply through tankers status Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

नगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणी टंचाईचे सावटही जाणवू लागले. जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरचा आकडा शंभरीजवळ पोहचू लागला आहे. सध्या जिल्ह्यातील ८८ गावे व ३५० वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ५६ हजार ५८६ नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९३ टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरु केला आहे.

नगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणी टंचाईचे सावटही जाणवू लागले. जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरचा आकडा शंभरीजवळ पोहचू लागला आहे. सध्या जिल्ह्यातील ८८ गावे व ३५० वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ५६ हजार ५८६ नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९३ टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरु केला आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने कहर केला. उन्हाळ्यात टॅंकरच्या आकड्याने अठरा वर्षांचे रेकॉर्ड मोडत उच्चांक गाठला होता. मागील वर्षी जिल्ह्यातील ५७२ गावे व ३२०० वाड्या-वस्त्यांवरील १३ लाख ४९ हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासन ८२७ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करीत होत. यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची स्थिती चांगली राहिल्याने टॅंकरला मागणी उशिरा आली.

यंदा एप्रिलच्या सुरवातीला जिल्ह्यातील पठार भागातून टॅंकरचे प्रस्ताव येण्यास सुरवात झाली. सुरवातीला टॅंकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्यवस्था लक्षात घेऊन सरकारने ते प्रांताधिकाऱ्यांकडे दिले आहेत. आजअखेर जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात शासकीय २५, तसेच खासगी ६८ टॅंकरचा समावेश आहे
 
तालुकानिहाय टॅंकर ः संगमनेर ९, अकोले २, नेवासे १, नगर १६, पारनेर १८, पाथर्डी ५, शेवगाव ४, कर्जत १३, जामखेड १९, श्रीगोंदे ६.


इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...