farmers agricultural news marathi weather prediction pune maharashtra | Agrowon

हलक्या पावसामुळे वाढली धास्ती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे  ः अरबी समुद्राच्या दक्षिण भागात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र येमेनकडे सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे आज (बुधवारी) आणि उद्या (गुरुवारी) कोकण व मध्य महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे. मात्र कमी दाबाची स्थिती निवळून गेल्यानंतर गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे  ः अरबी समुद्राच्या दक्षिण भागात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र येमेनकडे सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे आज (बुधवारी) आणि उद्या (गुरुवारी) कोकण व मध्य महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे. मात्र कमी दाबाची स्थिती निवळून गेल्यानंतर गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यातील ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मंगळवारी (ता. ३) ढगाळ हवामान होते. यामुळे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाच्या सरी बरसल्या. कोल्हापूर,नगर आणि साताऱ्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली.

मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हवामान कोरडे असल्याने किंचित गारठा जाणवत आहे. नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागात मंगळवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान आणि उकाड्यातही किंचित वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. ३) सकाळी महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १५.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील अनेक भागांत किमान तापमान कमी झाल्याने काही प्रमाणात गारठा जाणवत आहे.

विदर्भातील गोंदिया येथे १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये १५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. मराठवाड्यातही किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, जळगाव येथील तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली असून किमान तापमान १५ ते २० अंश सेल्सिअसदरम्यान होते. कोकणात अद्याप थंडी वाढलेली नसून किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.  

मंगळवारी (ता. ३) सकाळी विविध ठिकाणी असलेले किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः अकोला १६.७ (२), अलिबाग २३.१ (३), अमरावती १६.६, औरंगाबाद १६.६ (४), बीड १८.८ (५), बुलडाणा १७.३(२), चंद्रपूर १९.४ (५), डहाणू २३.७ (४), गोंदिया १५.५ (२), जळगाव १८.४ (५), कोल्हापूर १९.१ (३), महाबळेश्वर १५.० (१), मालेगाव १९.० (६), मुंबई २३.७ (४), नागपूर १५.८ (२), नांदेड २०.० (६), नाशिक १८.० (६), उस्मानाबाद १६.० (२), परभणी १८.३ (४), लोहगाव १९.४ (६), पुणे १८.३ (६), रत्नागिरी २४.६ (३), सांगली २०.० (४), सातारा १९.५ (५), सोलापूर २०.६ (४), ठाणे २३.०, वर्धा १६.९ (२), यवतमाळ १६.४ (१).


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...