ढगाळ हवामानामुळे थंडी गायब

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्यात पावसाला पोषक वातावरण असल्याने ढगाळ हवामान होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ होत थंडी गायब झाली आहे. विदर्भात शनिवारपर्यंत (ता. ८) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होत थंडी गायब झाली आहे. यातच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्प पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. मंगळवारी (ता. ४) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांची वाढ झाली. 

मंगळवारी (ता. ४) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १४.० (३), नगर १५.५ (३), धुळे १२.०, जळगाव १३.० (०), कोल्हापूर १८.६ (३), महाबळेश्‍वर १४.८ (१), मालेगाव १४.२ (३), नाशिक १२.५ (२), निफाड ११.२, सांगली १८.९ (४), सातारा १६.४ (३), सोलापूर २०.६ (३), अलिबाग २०.० (२), डहाणू १७.२ (०), सांताक्रुज १८.५ (१), रत्नागिरी २१.१ (२), औरंगाबाद १७.० (४), परभणी १८.४ (-३), नांदेड १४.० (०), उस्मानाबाद १५.४ (०) अकोला १६.६ (२), अमरावती १६.० (०), बुलडाणा १५.६ (०), चंद्रपूर १६.४ (१), गोंदिया १५.२(१), नागपूर १५.८(१), वर्धा १७.४ (३), यवतमाळ १८.०(२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com