farmers agricultural news marathi weather prediction pune maharashtra | Agrowon

पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

पुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढतच आहेत. सोमवारी (ता.६) सोलापूर येथे यंदाच्या हंगामात आतापर्यंतच्या उच्चांकी ४१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाच्या चटक्यासह उकाडाही वाढण्याची शक्यता आहे. पोषक हवामान असल्याने पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

पुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढतच आहेत. सोमवारी (ता.६) सोलापूर येथे यंदाच्या हंगामात आतापर्यंतच्या उच्चांकी ४१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाच्या चटक्यासह उकाडाही वाढण्याची शक्यता आहे. पोषक हवामान असल्याने पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

सोलापुरात तापमान चाळीशी पार असल्याने उन्हाचा ताप चांगला वाढला आहे. सोलापूरसह मालेगाव येथे उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअस, तर परभणी येथे ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरीत राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान ३६ ते ४० अंशांच्या आसपास आहे. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारी घराबाहरे पडणे असह्य होत आहे.

राज्यात सर्वत्र दिवसाबरोबरच रात्रीही उकाडा कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, शिरोळ तालुक्यासह विविध ठिकाणी वादळी वारा, गारपीटीसह पावसाने तडाखा दिला. सुमारे दिड तास झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. नारळ, बदाम, बाभळीची झाडे उन्मळून पडली. तसेच विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३, जळगाव ३९.६, धुळे ३९.६, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्‍वर ३२.२, मालेगाव ४१.२, नाशिक ३८.४, निफाड ३५.२, सांगली ३८.२, सातारा ३९.२, सोलापूर ४१.९, डहाणू ३२.८, सांताक्रुज ३३.२, रत्नागिरी ३२.०, औरंगाबाद ३७.६, परभणी ४०.६, अकोला ३९.६, अमरावती ३७.६, बुलडाणा ३६.२, ब्रह्मपुरी ३८.९, गोंदिया ३६.६, नागपूर ३७.६, वर्धा ३७.०.


इतर अॅग्रो विशेष
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....