farmers agricultural news marathi weather prediction pune maharashtra | Agrowon

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

पुणे  : कोकण वगळता राज्याच्या विविध भागात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका अधिक असल्याने अक्षरश: वैशाख वणवा पेटल्याची स्थिती आहे. बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम असून, राज्यात पूर्वमोसमी पावसालाही पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे  : कोकण वगळता राज्याच्या विविध भागात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका अधिक असल्याने अक्षरश: वैशाख वणवा पेटल्याची स्थिती आहे. बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम असून, राज्यात पूर्वमोसमी पावसालाही पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील उन्हाचा चटका सातत्याने वाढतच आहे. अकोला येथे तीन दिवस सातत्याने तापमान ४४.९ अंशावर आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथे तापमान ४४ अंशाच्या पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ३४ ते ४४ अंशांदरम्यान आहे. विदर्भात पारा ४० ते ४५ तर मराठवाड्यात ४१ ते ४४ अंश, तसेच कोकणात कमाल तापमान ३३ ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, विदर्भातील, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी (ता.६) विरून गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. विदर्भात सक्रिय असलेल्या दक्षिणोत्तर कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्राकार वाऱ्यात रूपांतर झाले आहे. यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होऊन, आज (ता.७) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.३, जळगाव ४३.३, धुळे ४२.६, कोल्हापूर ३९.५, महाबळेश्‍वर ३४.१, मालेगाव ४२.२, नाशिक ३९.८, निफाड ४०.५, सांगली ४०.९, सोलापूर ४३.२, डहाणू ३३.८, सांताक्रूझ ३४.३, रत्नागिरी ३४.५, औरंगाबाद ४१.६, परभणी ४३.५, नांदेड ४३.०, अकोला ४४.९, अमरावती ४३.४, बुलडाणा ४०.८, ब्रह्मपुरी ४४.०, चंद्रपूर ४४.०, गोंदिया ४०.२, नागपूर ४२.४, वाशीम ४३.०, वर्धा ४३.५, यवतमाळ ४३.५.
 
उन्हाचा ताप वाढलेली ठिकाणे :
अकोला ४४.९, ब्रह्मपुरी ४४.०, चंद्रपूर ४४.०, परभणी ४३.५, वर्धा ४३.५, यवतमाळ ४३.५, अमरावती ४३.४, जळगाव ४३.३, सोलापूर ४३.२, नांदेड ४३.०, वाशीम ४३.०.


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...