farmers agricultural news marathi weather prediction pune maharashtra | Agrowon

विदर्भात उष्ण लाटेचा इशारा 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 मे 2020

पुणे  : बंगाल उपसागरात आलेल्या ‘अम्फाम’ चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने राज्यात कोरडे हवामान आहे. यातच राज्यात उन्हाचा चटकाही वाढण्यास सुरवात झाली आहे. अंशत: ढगाळ हवामानामुळे उकाडाही वाढला आहे. आज (ता.२१) विदर्भात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे, तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

पुणे  : बंगाल उपसागरात आलेल्या ‘अम्फाम’ चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने राज्यात कोरडे हवामान आहे. यातच राज्यात उन्हाचा चटकाही वाढण्यास सुरवात झाली आहे. अंशत: ढगाळ हवामानामुळे उकाडाही वाढला आहे. आज (ता.२१) विदर्भात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे, तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे उत्तर व वायव्येकडून कोरडे वारे मध्य भारताकडे येत आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेचा ताप वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तापमान चाळीशी पार असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान बहुतांशी ठिकाणी ३४ ते ४३ अंश, कोकणात ३३ ते ३५ अंश, मराठवाड्यात ४० ते ४३ अंश तर विदर्भात ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान आहे. आजपासून (ता. २१) राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

बुधवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.८, धुळे ४२.४, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३४.६, महाबळेश्‍वर २८.४, मालेगाव ४०.०, नाशिक ३७.२, निफाड ३७.५, सांगली ३५.४, सातारा ३५.१, सोलापूर ४१.२, डहाणू ३४.३, सांताक्रूझ ३३.७, रत्नागिरी ३४.७, औरंगाबाद ४०.६, परभणी ४२.५, नांदेड ४१.०, अकोला ४४.०, अमरावती ४२.६, बुलडाणा ३९.७, ब्रह्मपुरी ४०.२, चंद्रपूर ४१.५, गोंदिया ३९.६, नागपूर ४२.२, वर्धा ४१.५. 
 
मॉन्सूनची प्रगती नाही 
बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. बुधवारी (ता.२०) मॉन्सूनच्या प्रगती झाली नाही. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत झाल्यानंतर अंदमान बेटांच्या आणखी काही प्रगती होईल असे, हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
अल्पमुदतीच्या कृषिकर्ज फेडीस...नवी दिल्ली : तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या...
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये...नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे...
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ‘निसर्ग’...पुणे  : अरबी समुद्रात महाराष्ट्र,...
देशात यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता :...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून...
पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने मॉन्सूनची...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
केरळचा बहुतांश भाग मॉन्सूनने व्यापलापुणे  : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना...
टोळधाड नियंत्रणासाठी हेलिकॉप्टर अन्...नागपूर ः विदर्भात अग्निशमन यंत्राच्या माध्यमातून...
निर्यातक्षम उत्पादन, बाजारपेठांचा शोध...नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील...
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२...नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि...
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...