Farmers Agricultural News Marathi Welcoming the Agriculture Minister for donating funds vardha Maharashtra | Agrowon

आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत केले कृषिमंत्र्यांचे स्वागत 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या कृषिमंत्री दादा भुसे यांचे स्वागत हारतुऱ्यांनी करण्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीला २१ हजार रुपयांची मदत करुन आमगाव खडकी या आदिवासीबहूल गावाने वेगळेपण जपले. ग्रामस्थांच्या या उपक्रमशीलतेचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. 

वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या कृषिमंत्री दादा भुसे यांचे स्वागत हारतुऱ्यांनी करण्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीला २१ हजार रुपयांची मदत करुन आमगाव खडकी या आदिवासीबहूल गावाने वेगळेपण जपले. ग्रामस्थांच्या या उपक्रमशीलतेचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. 

कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने कृषिमंत्री दादा भुसे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व त्यानंतर वर्धा जिल्ह्यात प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शिवारांना भेटी दिल्या. त्यासोबतच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना प्रोत्साहनही दिले. वर्धा दौऱ्यावर असलेल्या कृषिमंत्र्यांनी आमगाव खडकी या आदिवासीबहूल आणि जेमतेम ६०० लोकवस्तीच्या गावाला भेट दिली.

कृषीमंत्री येणार म्हणून हारतुऱ्यांऐवजी त्यांचे अभिनव पध्दतीने स्वागत करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे ग्रामस्थांनी एकमताने ठरविले. त्यानंतर काही वेळातच ‘कोरोना’ वरील उपाययोजनांसाठी २१ हजार रुपयांचा निधी गोळा करण्यात आला. या रक्कमेचा धनादेश तयार करुन गावशिवारात आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे सरपंच नंदा मंगाम यांच्या हस्ते सोपविण्यात आला. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, सुदाम पवार, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी रवींद्र राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी अजयकुमार राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, कृषी सहायक आबासाहेब रुपनार, राहूल घनबहाद्दूर, कृषी पर्यवेक्षक अनिल पराते, तहसीलदार महेंद्र सोनोने यावेळी उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...