दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील नेत्यांची एकमेकांवरच टीका

कोल्हापूर : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव टाकायचा सोडून शेतकरी संघटनांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करू लागल्याने सर्वसामान्य दुग्धोत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव टाकायचा सोडून शेतकरी संघटनांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करू लागल्याने सर्वसामान्य दुग्धोत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुधाला अनुदान मिळावे यासाठी एकत्रित लढाई अपेक्षित असताना सर्व संघटना वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहेत. यामुळे प्रत्येक जण आपले आंदोलन कसे यशस्वी झाले हेच दाखवत आहे. या पार्श्वभूमीवर दूध दराच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी शेतकरी संघटनांचे नेते एकमेकांच्या विरोधात बोलू लागल्याने मूळ प्रश्‍न बाजूला राहत असल्याची टीका शेतकरी नेत्यांवर दूध उत्पादकांकडून होत आहे.

गेल्या महिन्यापासून राज्यात विरोधी पक्षासह शेतकरी संघटनांकडून दूध दरप्रश्नी आपापल्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. दुधाच्या प्रश्नावरुन सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असला तरी शेतकरी संघटनेतील एकमेकांवरील नेत्यांची टीका फारशी कुणाला रुचली नसल्याचे चित्र आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता.१)दिवसभर एकमेकावर तोंडसुख घेतले. दूध प्रश्नावर बोलण्याऐवजी त्यांनी वैयक्तिक वादालाच प्राधान्य दिले. यामुळे दूध उत्पादकांचा भ्रमनिरास होत आहे.

केवळ अस्तित्व टिकवण्यासाठीच टीका केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी अशी टीका शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून होत असल्याने दूध उत्पादकांमध्ये नाराजी आहे. एकत्रित आंदोलन करून दबाव न टाकता एकमेकांचे आंदोलन कसे फसले, हे दाखवण्यात शेतकरी संघटनेचे नेते धन्यता मानत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com