शेतकऱ्यांची यंदाही हरभऱ्यावरच मोहर?

कृषी विभागाने नुकताच रब्बीचा अंतिम पीक पेरणी अहवाल जाहीर केला आहे. त्यातून काय निष्कर्ष समोर आलेत, वाचा सविस्तर...
Pik Perni 2021
Pik Perni 2021

कृषी विभागाने नुकताच रब्बी हंगामाचा अंतिम पीक पेरणी अहवाल जाहीर केला आहे. राज्यात रब्बी पिकाखालचे सरासरी क्षेत्र 51.20 लाख हेक्टर असते. पीक पेरणी अहवालानुसार गेल्या 3 जानेवारी अखेर 50.83 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याचे विभागाने (Agriculture Department) म्हटले आहे. म्हणजेच या रब्बीत (Rabi season) सरासरीच्या 99.27 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

पेरणी झालेल्या पिकांची परिस्थिती पाहायला गेल्यास गहू, ज्वारी, मका, हरभरा, आणि करडई पिकांच्या पेरण्या अजूनही काही प्रमाणात सुरू आहेत. रब्बी ज्वारी (Rabi sorghum) पीक काही ठिकाणी वाढीच्या ते पोटरीच्या अवस्थेत आहे. तर गहू मुगूट मुळे फुटणे, फुटवे फुटणे, ते लोंबी धरण्याच्या अवस्थेत आहे.

हा व्हिडिओ पाहिलात का? -  

रब्बीतील सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे हरभरा (Chana). त्याचा यंदाच्या रब्बीच्या एकूण पेऱ्यात 48 टक्के वाटा आहे. हा हरभरा सध्या फांद्या फुटणे ते फुलोरा अवस्थेत असल्याचे पीक पेरणी अहवालावरून स्पष्ट होते. मक्यावर मात्र काही ठिकाणी लष्करी अळीचा (Fall Army Worm) प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाने मान्य केले असून त्यावर उपाय सुरू असल्याचे सांगितले आहे. राज्यातील मका पीक सध्या वाढीच्या ते पोटरीच्या अवस्थेत आहे.

या अहवालात समोर आलेली महत्त्वाची बाब म्हणजे यंदा राज्यात तृणधान्यांचा (cereals) पेरा जवळपास 7 टक्क्यांनी घटला असून कडधान्यांचा (pulses) पेरा बरोबर 7 टक्क्यांनीच वाढला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी गव्हाऐवजी हरभऱ्याला वाढती पसंती देत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या वर्षीही राज्यात तृणधान्यांचा पेरा घटून हरभऱ्याचा पेरा वाढला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com