कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीसाठी लासलगाव येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

कांदा निर्यातबंदी हटविण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना कांदा उत्पादक.
कांदा निर्यातबंदी हटविण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना कांदा उत्पादक.

नाशिक  : केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने १० हजार टन कृष्णपुरम कांद्याला निर्यातीची परवानगी दिली. मग महाराष्ट्रातील कांद्याला निर्यातीसाठी केंद्र सरकार परवानगी का देत नाही, असा सवाल करीत जिल्ह्यातील कांदा उत्पादक संघटना व कांदा उत्पादकांनी लासलगाव येथे पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले. 

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, जय किसान फोरम, प्रहार शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन शुक्रवारी (ता.७) लासलगाव येथे आंदोलन केले. या वेळी शेकडो कांदा उत्पादक जमले होते. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, जय किसान फोरमचे निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक आनंद भोसले, हरी ठाकरे, सागर पूरकर, शंकर गायके, महेश काळे, खंडू गांगुर्डे, उद्धव न्याहारकर हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनात सहभागी झाले. घटनास्थळी पोलिस तत्काळ दाखल होत त्यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. लासलगावचे पोलिस निरीक्षक श्री. सोनवणे यांनी प्रशासनाकडून मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन राज्यभर उभारण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला. या वेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे निफाड तालुकाध्यक्ष संजय साठे, प्रहार शेतकरी संघटनेचे प्रकाश चव्हाण, गणेश निंबाळकर आदी उपस्थित होते.    या आहेत प्रमुख मागण्या

  • तत्काळ कांदा निर्यातबंदी उठवा.
  • आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाठी निर्यात खुली करा.
  • किमान ३०  रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे कांदा खरेदी करावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com