Farming agricultural Business boycott on paddy procurement gadchiroli maharashtra | Agrowon

कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान खरेदीवर बहिष्कार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत नसल्याने विरोध म्हणून आदिवासी विकास सेवा सोसायट्यांनी धान खरेदीवर बहिष्कार टाकला आहे. कुरखेडा तालुक्‍यातील दहा संस्थांचा यामध्ये समावेश असून मागण्यांचे निवेदन उपप्रादेशिक व्यवस्थापकांना देण्यात आले.

गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत नसल्याने विरोध म्हणून आदिवासी विकास सेवा सोसायट्यांनी धान खरेदीवर बहिष्कार टाकला आहे. कुरखेडा तालुक्‍यातील दहा संस्थांचा यामध्ये समावेश असून मागण्यांचे निवेदन उपप्रादेशिक व्यवस्थापकांना देण्यात आले.

उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत वडेगाव, आंधळी, गेवर्धा, कुरखेडा, कढोली, देऊळगाव सोनसरी, गोठणगाव व घाटी येथे आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. निवेदनानुसार, या केंद्रांवर गेल्या दीड महिन्यापासून प्रत्येकी दहा हजार क्‍विंटल धानाची खरेदी झाली आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाचे असहकार्य व खरेदी प्रक्रियेतील उदासीन धोरणामुळे सोसायट्यांसमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अनेक सोसायट्यांची खरेदी ही खुल्या ओट्यावर होते. त्यांच्याकडे आता साठवणुकीसाठी जागादेखील शिल्लक नाही. त्यातच महामंडळ धानाची उचल करण्यात दिरंगाई करीत आहे. शासन निर्णयानुसार हमाली व कमिशनची व्यवस्था करणे ही अभिकर्ता म्हणून महामंडळाची जबाबदारी आहे. मात्र अद्याप हमाली व कमिशनची रक्‍कम संस्थांना देण्यात आलेली नाही. तसेच शेतकऱ्यांना धानाचे चुकारेही अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील रोष असून त्याचा सामना सेवा सोसायटयांना करावा लागतो.

धान पावसाच्या पाण्याने भिजणार नाही याकरिता ताडपत्र्यांचा पुरवठा देखील महामंडळाने खरेदी केंद्रांना केलेला नाही. अशा वेळी धान खराब झाल्यास दीडपट वसुलीचे पत्र संस्थांना महामंडळाकडून देण्यात येते. अशा धोरणाला कंटाळत दहा केंद्रांनी खरेदी थांबवित बहिष्काराचा निर्णय घेतला. सामूहिक काटा बंद आंदोलन या अंतर्गत करण्यात येणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. सोसायट्यांच्या मागण्या निकाली काढण्याची मागणी संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव तलमले, सचिव हेमंत शेंदरे, सुधाकर वैरागडे, घनश्‍याम ठलाल आदींनी केली आहे.
 
अशी आहे स्थिती

  • हमाली व कमिशनची रक्‍कम सेवा संस्थांना देण्यात आलेली नाही. 
  • शेतकऱ्यांना धानाचे चुकारेही अद्याप मिळालेले नाहीत
  • धान पावसात भिजू नये यासाठी ताडपत्र्यांचा पुरवठा खरेदी केंद्रांना करण्यात  आलेला नाही.

इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...