Farming agricultural Business Cabinet meeting to decide on guarantee for tur procurement Mumbai Maharashtra | Agrowon

तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ः उपमुख्यमंत्री अजित पवार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे सुरू असून, तूर विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देऊ नये. तूर साठवण्यासाठी पुरेशा गोण्या उपलब्ध ठेवाव्यात. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील संपूर्ण तूर खरेदी करावी,’’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी आणि पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तूर खरेदीसाठी आवश्यक असलेली २०० कोटी रुपयांची हमी देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडावा त्यास मान्यता देण्यात येईल असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे सुरू असून, तूर विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देऊ नये. तूर साठवण्यासाठी पुरेशा गोण्या उपलब्ध ठेवाव्यात. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील संपूर्ण तूर खरेदी करावी,’’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी आणि पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तूर खरेदीसाठी आवश्यक असलेली २०० कोटी रुपयांची हमी देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडावा त्यास मान्यता देण्यात येईल असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२५) विधानभवनात आयोजित बैठकीत राज्यातील तूर उत्पादन आणि खरेदीचा आढावा घेण्यात आला. या वेळी कृषीमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदींसह कृषी, पणन, भारतीय अन्न महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सोयाबीनमध्ये आंतरपीक घेतलेल्या तुरीचे लागवडीखालील पूर्ण क्षेत्र ग्राह्य धरून उत्पादकता निश्चित करण्यात येणार आहे व त्यानुसार तूर खरेदी करण्यात येणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.

तीन लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी नोंदणी
यंदा राज्यात तूर विक्रीसाठी ३ लाख १५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, १ फेब्रुवारीपासून खरेदी सुरू झाली आहे. यंदा २ लाख २४ हजार ३८५ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...
औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...
अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...