Farming agricultural Business commodity rates in market committee pune maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५) साप्ताहिक बंद आणि रविवारचा (ता. २६) प्रजासत्ताक दिन अशा सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारी (ता. २७) भाजीपाल्याची आवक वाढेल असा अंदाज अडतदारांना होता. मात्र, सोमवारी भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक झाली. आवक संतुलित आणि शेतीमालाला उठाव असल्याने दर स्थिर असल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. 

पुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५) साप्ताहिक बंद आणि रविवारचा (ता. २६) प्रजासत्ताक दिन अशा सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारी (ता. २७) भाजीपाल्याची आवक वाढेल असा अंदाज अडतदारांना होता. मात्र, सोमवारी भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक झाली. आवक संतुलित आणि शेतीमालाला उठाव असल्याने दर स्थिर असल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. 

कांदा आवकेबाबत विलास रायकर म्हणाले, की शुक्रवारी (ता. २४) वंचित विकास आघाडीच्या बंदमुळे सोलापूर बाजार समिती बंद असल्याने कांद्याची सुमारे ३२५ ट्रक आवक झाली होती. मात्र, शनिवारी (ता. २५) पुणे बाजार बंद असल्याने आवक सोलापूरला मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी सोलापूरमधून कांदा खरेदी केला. सोमवारी पुण्यात १२५ ट्रक कांद्याची आवक झाली. या वेळी कांद्याला २८० ते ३०० रुपये दहा किलोपर्यंत दर होता. 

बटाट्याचे आडतदार राजेंद्र कोरपे म्हणाले, की सलग दोन दिवसांच्या बंदमुळे बटाट्याची मोठ्या आवकेची शक्यता होती. मात्र ‘वंचित’च्या बंदनंतर सर्वच बाजार समित्यांमध्ये आवक झाल्याने पुण्यातील आवक संतुलित राहिली. पुण्यात बटाट्याची ५० ट्रक आवक झाली बटाट्याला १५० ते २०० रुपये प्रति दहाकिलो दर होता. 


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...