पुण्यात हिरवी मिरची, मटारच्या दरात वाढ

पुणे बाजारसमितीत शेतीमालाची झालेली आवक
पुणे बाजारसमितीत शेतीमालाची झालेली आवक

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. ९) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. त्याची आवक आणि मागणी स्थिर होती. मात्र, हिरवी मिरची आणि मटारची आवक तुलनेने घटल्याने दरात वाढ झाली होती. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.    

परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरचीची सुमारे १५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवड्याची ४ टेम्पो, राजस्थानातून ८ ट्रक गाजराची, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबीची सुमारे ६ ट्रक, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून मटारची सुमारे १० ट्रक, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे ६ हजार गोणी, गुजरात, इंदौर आणि स्थानिक बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली होती.  स्थानिक आवकेमध्ये सातारी आलेची १२०० पोती, टॉमेटोची सुमारे ५ हजार क्रेट, भेंडी, काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची आणि तांबडा भोपळ्याची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, गवारीची ७ टेम्पो, कोबीची ८ टेम्पो, हिरवी मिरचीची ५ टेम्पो, शेवग्याची ४ टेम्पो, कांद्याची सुमारे १७५ ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दर (प्रति दहाकिलो) : कांदा : १८०-२२०, बटाटा : १३०-२००, लसूण : १०००-१८००, आले : सातारी २००-२५०, भेंडी : ३००-३५०, गवार : गावरान - सुरती ४५०-५५०, टोमॅटो : ६०-८०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : ४०-८०, चवळी : २००-२५०, काकडी : ६०-१००, कारली: हिरवी १५०-२००, पांढरी: १००-१२०, पापडी : १००-१२०, पडवळ : १५०-१६०, फ्लॉवर : ५०-८०, कोबी : ३०-७०, वांगी : २५०-३५०, डिंगरी: २००-२५०, नवलकोल: ८०-१००, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : ३५०-४५०, गाजर : १४०-१६०, वालवर : १००-१२०, बीट : ४०-६०, घेवडा : ८०-१००, कोहळा : १००-१५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : १५०-१६०, ढेमसे : २००-२५०, पावटा : २५०-३००, भुईमूग शेंग : ६००-६५०, मटार : परराज्य ३००-३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.    पालेभाज्या  पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता.९) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, मेथीची सुमारे ७० हजार तर हरभऱ्याच्या सुमारे २५ हजार जुड्यांची आवक झाली होती.   

पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ६००-१२००, मेथी : ५००-८००, शेपू : ५००-७००, कांदापात : ५०० -१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-६००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ७००-८००, मुळे : ६००- ८००, राजगिरा : ५००-७००, चुका : ७००-८००, चवळई : ५००-७००, पालक : ४००-६००. हरभरा गड्डी -५००-७००.   फळबाजार  रविवारी (ता.९) येथील बाजारात मोसंबीची ६० टन, संत्रीची सुमारे ५० टन, डाळिंबाची १५० टन, पपईची १५ टेम्पो, लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, कलिंगडाची २० टेम्पो, खरबुजाची १० टेम्पो, विविध जातींची बोरांची सुमारे ५०० गोणी, द्राक्षांची सुमारे २० टन, पेरूची १ हजार २०० क्रेट, चिक्कूची २ हजार डाग, स्ट्रॉबेरीची सुमारे ५ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव : लिंबे (प्रति गोणी) : १५०-३५०, मोसंबी : (३ डझन) : ८०-२२०, (४ डझन ) : २०-६०, संत्रा : (३ डझन) : १००-२८०, (४ डझन ) : ४०-१२०, डाळिंब (प्रति किलो) : भगवा : ४०-९०, गणेश : १५-४५, आरक्ता ३०-५५. कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, सफरचंद : काश्मिर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ८००-१४००, किन्नोर -(२५-३०) - १८००-२५००, बोरे (१० किलो) : चेकनट : ६५०-७००, उमराण : ३०-४०, चमेली : ८०-१५०, चण्यामण्या : ३८०-४२५. स्‍ट्रॉबेरी (२ किलो) - ८०-१५०.    फुले फुलांचे दर (प्रतिकिलो) : झेंडू : १०-३०, गुलछडी : ८०-१५०, कापरी : १०-२०, शेवंती : ८०-१२०, अ‍ॅस्टर : ८-१२, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : ३०-१००, डच गुलाब (२० नग) : १२०-२२०, लिली बंडल : ६-८, जरबेरा : ४०-६०, कार्नेशियन - १२०-१८०.    मटण मासळी   गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता.९) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीची सुमारे ५०० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे दीड टन आवक झाली होती. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.  

कोरोना विषाणूबाबत समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या अपप्रचारामुळे चिकन, अंड्यांच्‍या मागणीत  ५० टक्के घट झाली आहे. परिणामी चिकनच्या दरात प्रतिकिलोला २० रुपये, तर अंडीच्या दरात शेकड्याला २० ते २५ रुपये घट झाल्याची माहिती व्यापारी रूपेश परदेशी यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी  पापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम : ९००-१०००, लहान ७५०, भिला :  ६००, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४८०-५५०, रावस : लहान - ५५०-६००,  मोठा : ८००, घोळ : ६५०, भिंग : ३६०, करली : २८०, करंदी : ४००, पाला : लहान ७००, मोठे : १२००, वाम :  लहान ५५०, मोठे ९००,  ओले बोंबील : १८०-२००.

कोळंबी  लहान २८०-३२०, मोठे : ४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : २८०-४००, मांदेली : १२०-१४०, राणीमासा :२०० खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ५५०-६०० . 

खाडीची मासळी  सौंदाळे : ३२०, खापी : ३२०, नगली : ४८०, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : २४०, शेवटे : २८०, बांगडा : लहान २४० , मोठे २८०-३२०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १६०-१८०. 

नदीची मासळी  नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २४० वाम : ५५०. 

चिकन   १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २३०.

अंडी   गावरान : शेकडा : ७२० डझन : ९६ प्रति नग : ८, इंग्लिश : शेकडा : ३७५ डझन : ६० प्रतिनग : ५.   

मटण 

बोकडाचे : ५८०, बोल्हाईचे : ५८० खिमा : ५८०, कलेजी : ६४०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com