Farming agricultural Business Consumer response to direct agriculture commodity sales aurangabad maharashtra | Agrowon

अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत गटांच्या शेतमाल विक्रीला प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 डिसेंबर 2019

औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली विविध प्रकारची धान्ये, डाळी, हळद, गुळाची काकवी, गुळपट्टी आणि लाकडी घाण्यावरील तेल यासह विविध पदार्थांना अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात शुक्रवारी (ता. २७) पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषतः शहरी ग्राहकांकडून या उत्पादनांना सर्वाधिक पसंती मिळत होती. 

औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली विविध प्रकारची धान्ये, डाळी, हळद, गुळाची काकवी, गुळपट्टी आणि लाकडी घाण्यावरील तेल यासह विविध पदार्थांना अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात शुक्रवारी (ता. २७) पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषतः शहरी ग्राहकांकडून या उत्पादनांना सर्वाधिक पसंती मिळत होती. 

अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी मराठवाड्यासह अन्य भागातील शेतकऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली. आत्मा प्रकल्पांतर्गत तयार झालेले शेतकरी गट प्रामुख्याने प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. प्रदर्शनात जवळपास २० हून अधिक शेतकरी गट आणि महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे. प्रदर्शनस्थळी स्वतंत्र विभाग त्यासाठी तयार करण्यात आला आहे. प्रदर्शनामधील ते खास आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

प्रदर्शनाच्या उद्‍घाटनाची वेळ दुपारी चारची होती, पण त्या आधीच प्रदर्शनस्थळावर शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. पारंपरिक पद्धतीने बनवलेले कच्ची घाणा करडी तेल, गुळाची काकवी, गुळाची पावडर, गूळ, यासह तूरडाळ, मटकी डाळ, हरभरा डाळ, उडीदडाळीसह ज्वारी, गहू आदी धान्ये आणि लाल मिरचीची खरेदी-विक्री येथे होत होती. विशेषतः यापैकी बहुतांश धान्य आणि उत्पादने ही सेंद्रिय पद्धतीची असल्याने ग्राहकांची या स्टॅालवर सर्वाधिक गर्दी होती. गावरान खा, निरोगा राहा, सेंद्रिय पद्धतीची उत्पादने असे फलक या विभागात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पदार्थात काय घटक आहेत याची माहिती ग्राहक थांबून घेत होते. 

कांद्याची रिंग, नागलीचे पोंगे
महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनामध्ये हळद, लोणचे, उडीद पापड, नागली पापड, कच्ची पाणीपुरी यासारखे पारंपरिक पदार्थ आहेतच. पण त्याशिवाय कांद्याची रिंग आणि नागलीचे पोंगे यासारखे वेगळे उपपदार्थही या ठिकाणी पाहावयास व चाखावयास मिळत होते. या पदार्थांकडे ग्राहक आकर्षित होत होते.  

लाकडी घाण्यावरील तेल
लाकडी घाण्यावरील तेलाचे विविध प्रकार या ठिकाणी आहेत. त्यात करडी तेल, शेंगदाणा तेल, खोबरे तेल, तीळ तेल, जवस तेल, मोहरी तेल यासारखे विविध तेलाचे प्रकार उपलब्ध आहेत. शहरी ग्राहक तेलाची आवर्जून खरेदी करत आहेत.    


इतर इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत...औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या...
नैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा :...औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन...
मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय...औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास...
अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी...औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा...औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी...
जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन...औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस...पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ...
कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक...औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा...
कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-...औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा...
पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज...औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे...औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत...औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान...सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी...
पोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्‍घाटन औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी...
औरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी...पुणे  : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...