Farming agricultural Business cotton procurement start soon Jalgaon Maharashtra | Agrowon

खानदेशात सीसीआयची कापूस खरेदी लवकरच

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 मे 2020

जळगाव  ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी सुरू झालेली नाही. परंतु, लवकरच ही खरेदी सुरू होईल, अशी शक्‍यता आहे. सीसीआयचे केंद्र निश्‍चित असलेल्या क्षेत्रातील बाजार समित्यांतर्फे कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना टोकन दिले जाणार आहे. या टोकन वितरणासाठी सॉफ्टवेअरची जुळवाजुळव केली जाणार आहे.

जळगाव  ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी सुरू झालेली नाही. परंतु, लवकरच ही खरेदी सुरू होईल, अशी शक्‍यता आहे. सीसीआयचे केंद्र निश्‍चित असलेल्या क्षेत्रातील बाजार समित्यांतर्फे कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना टोकन दिले जाणार आहे. या टोकन वितरणासाठी सॉफ्टवेअरची जुळवाजुळव केली जाणार आहे.

सीसीआयची खरेदी सुरू करण्यासंबंधी केंद्रधारक (जॉब वर्कर्स) कारखानदारांची बैठक शुक्रवारी (ता.१) झाली. या बैठकीत खरेदी सुरू करण्याचा निर्णय झाला. तसेच फक्त एफएक्‍यू कापूस खरेदी सुरू करण्याबाबत मंथन झाले. कारण कमी दर्जाचा कापूस खरेदी केला तर त्यात हवा तसा उतारा मिळणार नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांचे नुकसानही व्हायला नको, याबाबत कारखानदारांनी मुद्दे मांडले.

सीसीआयतर्फे खानदेशात धुळ्यातील शिरपूर, शहादा (ता.नंदुरबार), जळगावमधील बोदवड, भुसावळ, जामनेर, पहूर (ता.जामनेर), शेंदूर्णी (ता.जामनेर), पाचोरा, जळगाव, चोपडा येथे कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे.

केंद्रात कापसाच्या खरेदीनंतर त्याचा ढीग लावणे, जिनींग करणे (रुई निर्मिती), प्रेसिंग (दबाई) व गाठी बांधणे यासाठी मजुरांची मोठी आवश्‍यकता आहे. या कामात मध्य प्रदेशातील सेंधवा, खरगोन, बडवानी, बऱ्हाणपूर भागातील मजूर पारंगत आहेत. स्थानिक मजूर हे काम करायला तयार नसतात. लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर उपलब्ध करून घेताना अडचणी येत असून, त्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी कारखानदार, केंद्रधारक करीत आहेत.

 
महासंघाची खरेदी वेगात
पणन महासंघाची कापूस खरेदी वेगात सुरू असून, पाच केंद्रांवर सुमारे साडेनऊ हजार क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. जळगाव जिल्ह्यात महासंघाची खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांना चुकारे अद्याप दिले नसल्याची माहिती मिळाली.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...