Farming agricultural Business cotton procurement start from tomorrow Akola Maharashtra | Agrowon

मूर्तिजापूरमध्ये उद्यापासून सीसीआयची कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

अकोला   ः भारतीय कपास निगम अर्थात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मूर्तिजापूर येथील बाजार समितीच्या आवारात सुरु करण्यास परवानगी मिळाली असून या तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता आजपासून (ता.११) नोंदणी करता येणार आहे. येथे मंगळवारपासून (ता.१२) प्रत्यक्ष खरेदी सुरु होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली आहे.

अकोला   ः भारतीय कपास निगम अर्थात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मूर्तिजापूर येथील बाजार समितीच्या आवारात सुरु करण्यास परवानगी मिळाली असून या तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता आजपासून (ता.११) नोंदणी करता येणार आहे. येथे मंगळवारपासून (ता.१२) प्रत्यक्ष खरेदी सुरु होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली आहे.

हे केंद्र सुरु करण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व आमदार हरिष पिंपळे यांनी पाठपुरावा केला होता. मूर्तिजापूर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होण्याच्या दृष्टीने सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरु व्हावे अशी मागणी आमदार पिंपळे यांनी केली होती. यासंदर्भात ३० एप्रिलला पालकमंत्री कडू यांनीही बैठक घेऊन निर्देश दिले होते. तर केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनीही याच आठवड्यात आढावा बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले होते. त्यादृष्टीने सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत नितीन पाठक मो. ९४०५१५३२५६, श्रीमती गावंडे मो. ७०३८६९२४४७ यांच्याशी संपर्क करून ही नोंदणी फोनवरुन करावी. नोंदणीसाठी प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन बाजार समितीला करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...