नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख क्विंटल कापूस खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यावर्षीच्या खरेदी हंगामात सोमवारपर्यंत (ता. २०) राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापारी यांची मिळून एकूण १२ लाख ५० हजार १४३.९६ क्विंटल कापूस खरेदी झाली. त्यात कापूस उत्पादक पणन सहकारी महासंघाकडून २ लाख ३८ हजार ६३०.३१, सीसीआयतर्फे ३ लाख ८२ हजार ४०१, खासगी व्यापाऱ्यांच्या ६ लाख ३५ हजार ११२ क्विंटल कापूस खरेदीचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील पणन महासंघाच्या भोकर आणि तामसा येथील केंद्रावर २१४१ शेतकऱ्यांचा ४५ हजार ६१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सीसीआयतर्फे नांदेड, किनवट, धर्माबाद, नायगाव, कुंटूर, बिलोली येथील केंद्रांवर ६८ हजार २१० क्विंटल कापूस खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्यांकडून हदगाव, किनवट, भोकर, धर्माबाद येथे २ लाख ४९ हजार ८६२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

परभणी जिल्ह्यात पणन महासंघ, सीसीआय, खासगी व्यापारी मिळून एकूण ३ लाख ६३ हजार ७२ क्विंटल कापूस खरेदी झाली. जिल्ह्यात पणन महासंघाकडून पाथरी, गंगाखेड, परभणी येथील ७ केंद्रांवर ५ हजार ७३३ शेतकऱ्यांच्या १ लाख ६६ हजार १५१.७० ७८८.९६ क्विंटल कापसाची खरेदी झाली. सीसीआयतर्फे सेलू, मानवत, जिंतूर, पूर्णा, ताडकळस येथे २ लाख ५७ हजार ९९७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, बोरी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गंत खासगी व्यापाऱ्यांनी ३ लाख ७८ हजार २६४ क्विंटल कापसाची खरेदी केली. परभणी जिल्ह्यात एकूण ७ लाख ९६ हजार ४१२.७० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथे पणन महासंघातर्फे १ हजार ३५४ शेतकऱ्यांचा २७ हजार ४७८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सीसीआयकडून हिमायतनगर आणि जवळा बाजार येथील केंद्रावर ५६ हजार १९४ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. हिंगोली, आखाडा बाळापूर येथे खासगी व्यापाऱ्यांकडून ६ हजार ९८६ क्विंटल कापसाची खरेदी झाली. जिल्ह्यात एकूण ९० हजार ६५८.६५ क्विंटल कापूस खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्याकडून कापसाची सरासरी ४६५० ते ५२८५ रुपये क्विंटल दराने खरेदी करण्यात आली.

पणन महासंघाची कापूस खरेदी (क्विंटल)
जिल्हा   खरेदी केंद्र संख्या कापूस खरेदी शेतकरी संख्या
नांदेड ४५,०००  २१४१
परभणी  १,६६,१५१ ५७३३
हिंगोली २७,४७८   १३५४
सीसीआयची कापूस खरेदी (क्विंटल)
जिल्हा  केंद्र संख्या कापूस खरेदी
नांदेड ६८,२१०
परभणी  ७  २,५७,९९७
हिंगोली   ५६,१९४
खासगी कापूस खरेदी (क्विंटल)
जिल्हा बाजार समित्या कापूस खरेदी
नांदेड  ९   २,४९,८६२
परभणी   ३८  ३,७८,२६४
हिंगोली ६९८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com