तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल कापूस खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१९-२० च्या खरेदी हंगामात शुक्रवारपर्यंत (ता. १४) राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ (फेडरेशन), भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापाऱ्यांनी मिळून एकूण १७ लाख ४१ हजार ५३३ क्विंटल कापसाची खरेदी केली. त्यामध्ये राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ४ लाख ४२ हजार ७०२, सीसीआयच्या ४ लाख ९६ हजार २९१, खासगी व्यापाऱ्यांच्या ८ लाख २  हजार ५४० क्विंटल कापसाचा समावेश आहे.

पणन महासंघातर्फे नांदेड जिल्ह्यातील भोकर आणि तामसा येथील केंद्रांवर ४४८० शेतकऱ्यांचा ९१ हजार ९९८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सीसीआयतर्फे नांदेड, किनवट, धर्माबाद, नायगाव, कुंटूर, बिलोली येथील केंद्रांवर ९८ हजार ४२० क्विंटल कापसाची खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्यांकडून हदगाव, किनवट, भोकर, धर्माबाद येथे ३ लाख १९ हजार ७८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. जिल्ह्यात पणन महासंघ, सीसीआय, खासगी मिळून एकूण ५ लाख ९ हजार ४९६ क्विंटल कापसाची खरेदी झाली.

पणन महासंघाकडून परभणी जिल्ह्यात पाथरी, गंगाखेड, परभणी येथील १० केंद्रांवर १० हजार ३३८ शेतकऱ्यांच्या ३ लाख ७ हजार ९७४ क्विंटल कापसाची खरेदी झाली. सीसीआयतर्फे सेलू, मानवत, जिंतूर, पूर्णा, ताडकळस येथे ३ लाख २२ हजार ८९७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, बोरी या बाजार समित्यांतर्गत खासगी व्यापाऱ्यांनी ४ लाख ७१ हजार ९७० क्विंटल कापसाची खरेदी केली. जिल्ह्यात एकूण ११ लाख २ हजार ८४१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

पणन महासंघातर्फे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथे २ हजार ६५ शेतकऱ्यांचा ४२ हजार ७२९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सीसीआयकडून हिमायतनगर आणि जवळा बाजार येथील केंद्रांवर ७४ हजार ९७४ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. हिंगोली, आखाडा बाळापूर येथे खासगी व्यापाऱ्यांकडून ११ हजार ४९२ क्विंटल कापसाची खरेदी झाली. जिल्ह्यात एकूण १ लाख २९ हजार १९५ क्विंटल कापसाची खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची प्रतिक्विंटल सरासरी ४६५० ते ५००० रुपये दराने खरेदी करण्यात आली.  

पणन महासंघाची कापूस खरेदी (क्विंटल)
जिल्हा खरेदी केंद्रसंख्या कापूस खरेदी शेतकरीसंख्या
नांदेड  २  ९१९९८.७० ४४८०
परभणी १०  ३०७९७४.६० १०३३८
हिंगोली  १   ४२७२९.४५  २०६५
सीसीआय ची कापूस खरेदी (क्विंटल)
जिल्हा   केंद्रसंख्या  कापूस खरेदी
नांदेड   ९८४२०
परभणी ३२२८९७
हिंगोली   ७४९७४
खासगी कापूस खरेदी (क्विंटल)
जिल्हा   बाजार समित्या  कापूस खरेदी
नांदेड  १४ ३१९०७८
परभणी  ५०  ४७१९७०
हिंगोली २  ११४९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com