Farming agricultural Business crop loan distribution status Nanded Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज वाटप

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी सोमवारपर्यंत (ता.१) ७२८४ शेतकऱ्यांना ४७ कोटी ४७ लाख ६६ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी सोमवारपर्यंत (ता.१) ७२८४ शेतकऱ्यांना ४७ कोटी ४७ लाख ६६ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. पीककर्ज मागणीसाठी जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार ७०० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील विविध बॅंकांना यंदाच्या खरिपात एकूण २ हजार ३१ कोटी ६७ लाख ७० हजार रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १८५ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना १ हजार ५५७ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २८८ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ५ हजार ९६३ शेतकऱ्यांना ३१ कोटी ५७ लाख ६६ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ३५० शेतकऱ्यांना २ कोटी ८९ लाख रुपये, व्यापारी बॅंकांनी ९७१ शेतकऱ्यांना १३ कोटी १ लाख रुपये असे एकूण ७ हजार २८४ शेतकऱ्यांना ४७ कोटी ४७ लाख ६६ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले. जिल्हा बॅंक कर्जवाटपात पुढे असली तरी व्यापारी, खाजगी, ग्रामीण बॅंक मात्र कर्जवाटपात पिछाडीवर आहेत.

कर्जवाटप स्थिती
बॅंक उद्दिष्ट वाटप रक्कम शेतकरी संख्या टक्केवारी
जिल्हा बॅंक. १८५.७४ ३१.५७ ५९६३ १७
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक २८८.२५. २.८९ ३५० १.०८
व्यापारी बॅंका १५५७.६७ १३.०१ ९७१ ०.८४

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...