पुणे बाजारसमितीत चंपाषष्ठीमुळे वांगी, कांदा पातीला मागणी वाढली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः चंपाषष्ठीमुळे वांगी आणि कांदा पातीची मागणी वाढली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २) वांग्याची सुमारे ५ टेम्पो आवक झाली होती. या वेळी वांग्याला ३०० ते ५०० रुपये प्रति दहा किलो दर होता. तर हाच दर किरकोळ बाजारात १०० रुपयांपर्यंत होता. कांदा पातीची सुमारे १० हजार जुड्या आवक झाली होती. या वेळी शेकड्याला अडीच हजार रुपयांपर्यंत दर होता. किरकोळ बाजारात कांदा पातीच्या एका जुडीला ५० रुपयांपर्यंत दर होता.

वांग्याच्या आवकेबाबत ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ म्हणाले, की चंपाषष्ठीनंतर साधारण वांग्याचा हंगाम सुरू होतो. सध्या विविध वाणांची आणि संकरित वांगी बाजारात येत असून, यामध्ये भरताची हिरवी आणि जांभळी तर लहान आकाराची काटेरी, हिरवी आणि जांभळ्या वांग्याची आवक होत आहे. 

सध्या दररोज सरासरी ५ते ६ टेम्पो आवक होत असून, ही आवक प्रामुख्याने पुणे विभागातील सांगली, सातारा, नगर, सोलापूर, पुणे, आणि जळगाव भागांतून होत आहे. सध्या आवक आणि मागणी वाढल्याने दर ३०० ते ५०० रुपये प्रति दहा किलो आहे. 

चंपाषष्ठीला कांद्याच्या पातीचीदेखील आवक होत असून, सध्या आवक तुलनेने कमी आहे. पावसाने कांदा रोपांचे झालेले नुकसान, रोपांची टंचाई यांमुळे अजूनही अनेक ठिकाणी लागवडी सुरू आहेत. त्यामुळे आवक कमी असून दर वाढलेले आहेत. शेकड्याला साधारण १ हजार ते २ हजार रुपयांपर्यंत दर आहे. असेही भुजबळ यांनी सांगितले. 

किरकोळ दरात दुपटीने वाढ  बाजार समितीमध्ये घाऊकमध्ये वांग्याचे दर ५०० रुपये दहा किलो असले, तरी किरकोळ बाजारात हे दर १०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. कांदा पातीचे दर ५० रुपये प्रति जुडीपर्यंत आहेत. 

गत पाच दिवसांतील कांदा पात आवक (जुड्या) आणि दर (प्रतिशेकडा)  
दिनांक आवक  दर
९ हजार ३०० ८००ते२५०० 
७ हजार ७०० १५०० ते २०००
२९ ६ हजार ९००  ८००ते१५००
२८ ९ हजार २०० ८०० ते १५००
२७ ७ हजार १०० ७००ते२०००
गेल्या पाच दिवसांतील वांगी आवक आणि दर (रुपये, क्विंटल)
दिनांक आवक दर
३०९  १२०० ते ५०००
 २६२   १४०० ते ६०००
२९  ४१५ १००० ते ४५००
२८ २९३ १२०० ते ५०००
२७ नोव्हेंबर  ३४५ १००० ते ५००० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com