कांदा निर्यात खुली करण्याची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी

कांदा निर्यातीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देताना शिष्टमंडळ
कांदा निर्यातीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देताना शिष्टमंडळ

नाशिक  : कांद्याची आवक वाढत असल्याने दरात घसरण सुरू आहे. या प्रश्‍नी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली करावी, अशी मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. 

कांद्याचे उत्पादन वाढल्याने व स्थानिक बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढल्याने दरात फटका बसत आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाले आहे. त्यातच कांदा दरात सुरू असलेली घसरण पाहता शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून केंद्राने कांदा निर्यातीवरील निर्बंध उठवावे, या मागणीसाठी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार डॉ. भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

या वेळी शिष्टमंडळात अन्न महामंडळाचे संचालक रमेश पवार, रामा पाटील, जगन्नाथ पाटील, दादा देशमुख, अशोक चव्हाण, यतीन पवार, प्रवीण पवार, रूपेश शिरोडे, दीपक पवार यांचा समावेश होता. संपूर्ण जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे निर्यात बंद असल्याने कांद्याचे दर दोन हजारांच्या आत आले आहेत. कांदा उत्पादकांना येणारा उत्पादन खर्च, बाजारपेठेत विक्रीसाठी येणारा खर्च तसेच नैसर्गिक अडचणींबाबत शिष्टमंडळाने श्री. गडकरी यांना माहिती दिली. चालू वर्षी उत्पादन खर्च वाढला असून कांद्याला किमान दोन हजार पाचशे ते तीन हजार हमीभाव मिळावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com