Farming agricultural Business demand for to start Financial transactions in several branches of district bank Nanded Maharashtra | Agrowon

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक व्यवहार सुरु ठेवा : प्रल्हाद इंगोले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमधील आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे शेतक-यांची मोठी गैरसोय होत आहे. शेतक-यांना पिकविमा परतावा, ऊस देयके आदिंच्या रकमा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अदा केल्या जातात. राष्ट्रीयीकृत बँकांतील गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखांमधील आर्थिक व्यवहार सुरु करावेत, अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.

नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमधील आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे शेतक-यांची मोठी गैरसोय होत आहे. शेतक-यांना पिकविमा परतावा, ऊस देयके आदिंच्या रकमा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अदा केल्या जातात. राष्ट्रीयीकृत बँकांतील गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखांमधील आर्थिक व्यवहार सुरु करावेत, अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.
 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनेक शाखांत पिकविमा परतावा तसेच ऊसाची देयके आदीच्या रकमा शेतक-यांच्या खात्यावर जमा होत आहेत. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रारंभीच्या काळात जिल्हा प्रशासनाने आर्थिक व्यवहार बंद करण्याचे निर्देश सर्व शाखांना दिले होते. परंतु, त्यानंतर अत्यावश्यक सेवेंतर्गत बॅंकांतील सर्व व्यवहार सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये अद्याप आर्थिक व्यवहार सुरु झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

सध्या लॉकडाऊनमुळे शेतकरी आपापल्या शेतांवर कामे करीत आहेत. हळद, एरंडी, गहू काढणीची कामे सुरु आहेत. मजुरीसह अन्य कामांसाठी शेतक-यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांतील आर्थिक व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी श्री. इंगोले यांनी केली आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...