मुंबई बाजार समितीत देवगड हापूस दाखल

मुंबई बाजारसमितीत देवगड हापूसची झालेली आवक
मुंबई बाजारसमितीत देवगड हापूसची झालेली आवक

मुंबई : हवामान बदलामुळे यंदा कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम दोन महिने लांबणीवर गेलेला असतानाच गुरुवारी (ता. ३०) वसंत पंचमीच्या मुहूर्तावर देवगड तालुक्यातील हापूस आंब्याच्या चार पेट्या मुंबई बाजार समितीतील घाऊक फळबाजारात दाखल झाल्या आहेत.

सर्वसाधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणारा हा हापूस आंबा एक महिना उशिराने बाजारात आला आहे. या आंब्याची पाच डझनांची एक पेटी दहा हजार रुपयांच्या दरम्यान आहे. कोकणात यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. हापूस आंब्यावर अद्याप मोहराचा पत्ता नाही. कडाक्याची थंडी आणि त्याच काळात तीव्र उष्णता यामुळे हापूस आंब्यावर अद्याप मोहर नाही. मात्र काही हापूस आंबा बागायतदार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस आंब्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे अरविंद वाळके (कुणकेश्वर) हे हापूस आंबा बागायतदार यशस्वी झाले आहेत. त्यांच्या हापूस आंब्यांना नोव्हेंबर महिन्यात मोहर आल्याने मध्यम व मोठ्या प्रकारचे हापूस आंबे तयार झाले आहेत. त्यांनी या हापूस आंब्याच्या पाच डझनांच्या चार पेट्या बाजार समितीतील व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे पाठविल्या.

पाच डझनांच्या एका पेटीचा दर १० ते ११ हजार रुपये आहे. त्यामुळे सध्या एक हापूस आंबा १६६ रुपयांना पडणार आहे. तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. बाजारात आलेला हा हापूस आंबा येत्या दहा ते बारा दिवसांत पिकणार आहे. हंगामातील पहिला हापूस आंबा खाण्यासाठी मुंबईतील ग्राहकांची स्पर्धा लागत असल्याचे व्यापारी श्री. पानसरे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com