Farming agricultural Business direct vegetables sell status in region Pune Maharashtra | Agrowon

पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची थेट विक्री

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. यामध्ये पुणे, नगर आणि सोलापूर या शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला पुरविण्यासाठी शेतकरी गटांनी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत या गटांनी या शहरांतील विविध सोसायट्यांमध्ये सुमारे ३२९ क्विंटल भाजीपाल्याची थेट विक्री केली आहे.

पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. यामध्ये पुणे, नगर आणि सोलापूर या शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला पुरविण्यासाठी शेतकरी गटांनी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत या गटांनी या शहरांतील विविध सोसायट्यांमध्ये सुमारे ३२९ क्विंटल भाजीपाल्याची थेट विक्री केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्यामुळे किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामुळे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी विक्रेते चढ्या दराने भाजीपाला विक्री करीत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोसायटीमध्येच रास्त दरात ताजा भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा पर्याय समोर आला आहे. या अंतर्गत कृषी विभाग व आत्मा विभागाशी चर्चा केल्यानंतर शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्यानुसार शेतकरी, गट, कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या फळभाज्या, भाजीपाला व फळांची यादी तयार करण्याचे काम तयार सुरू केले गेले. शेतकरी गट, कंपन्यांकडून पुरवठा होऊ शकणारा भाजीपाला, फळभाज्या आणि फळांचा दर यांची माहिती असणारा फॉर्म भरून घेण्यात आला. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची व्यवस्था निर्माण करून देण्यावर भर दिला गेला. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी शेतकरी व गटांनी भाजीपाला थेट विक्री करण्यास सुरूवात केली आहे.

सध्या पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील सुमारे १०४ शेतकरी गटांनी थेट भाजीपाला विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना विक्रीसाठी शहरांमधील सुमारे १७४ ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
 

पुणे विभागातील भाजीपाला विक्री करत असलेल्या शेतकरी गटांची संख्या, शेतीमाल
जिल्हा शेतकरी गट उपलब्ध ठिकाणे विकलेला शेतीमाल (क्विं)
पुणे ५१ १०५ १७६
नगर ३५ ३८ ९०
सोलापूर १८ ३१ ६३

 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...