Farming agricultural Business district bank gives fund for food Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्हा बॅंकेकडून गरजूंसाठी दोन कोटींची मदत 

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याच्या किटसाठी एक कोटी व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी अशी दोन कोटींची मदत दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याच्या किटसाठी एक कोटी व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी अशी दोन कोटींची मदत दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

श्री. भोसले म्हणाले, की ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर, स्थलांतरित कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी सामाजिक भावनेतून या नागरिकांची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यामधील स्थलांतरित, तसेच मोलमजुरी करणारे मजूर व गरजू कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी अन्नधान्याचे कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे बँकेने संबंधित तहसीलदारांकडून गरजू लाभार्थ्यांची यादी प्राप्त करून घेतली आहे.

या यादीनुसार संबंधितांना महसूल विभाग व बँकेच्या माध्यमातून अन्नधान्याचे कीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यात तेल, तांदूळ, साखर, चटणी, हळद, गहू, आटा इत्यादी वस्तूंचा समावेश केला आहे. सर्वसाधारण १७,५०० किटचे वितरण गरजू कुटुंबांना केले जाणार आहे. या किटसाठी बँक एक कोटी खर्च करणार आहे. तसेच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक मदत करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार बँकेने संचालक मंडळ सदस्यांचा सभाभत्ता व बँक अधिकारी/ सेवकांचे एक दिवसाचे वेतन मिळून १६ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस करण्यात आली. हा धनादेश बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसेच २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या नफ्यातून मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी देण्याचा निर्णयही बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...