संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापुरात `फोन करा अन किराणा माल, भाजीपाला मिळवा` संकल्पना

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी संचारबंदी लागू केली आहे. पण किराणा माल, भाजीपाला खरेदीसाठी सर्वाधिक संख्येने नागरिक घराबाहेर पडत असल्याने गर्दी वाढत आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने किराणामाल आणि भाजीपाला नागरिकांना घरपोच मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून फोन करा आणि किराणा, भाजीपाला घरपोच मिळवा, अशी संकल्पना राबवली आहे. त्यासाठी खास शहरातील किराणा दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांची फोनसह यादी प्रसिद्ध केली आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी उत्‍तम पाटील यांनी त्यासाठीचे नियोजन केले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, त्यांना आवश्यक आहे तो किराणा आणि भाजीपाला घरपोच मिळेल, तशी सूचना प्रशासनाने संबंधितांना दिली आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. पुढे दिलेल्या यादीतील दुकानदाराकडे फोनवरुन संपर्क साधून आपली मागणी नोंदवावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे. किराणा, भाजीपाल्यासाठी इथे साधा संपर्क  सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी घाऊक व किरकोळ ग्राहक भांडारच्या सुपरमार्केट आणि होटगी रस्त्यावरील आसराच्या शाखेत चंद्रकांत गुरव (९४२३३२५९८८) महेश आंदेली, आसरा चौक, बसस्टॉपसमोर (९८२३१७९४७७), तसेच श्री. झांबरे, सुंदरनगर आर. टी. ओ. कार्यालया जवळ (८८३०३४३४९०), साई सुपर मार्केट (मुकुंद भट्टड) यांच्या सातरस्ता शाखा, मोरारजी विद्यापीठ, जुळे सोलापूर शाखा, अक्कलकोट रोड, शाखा, दमाणी चौक, मरिआई मंदीर शाखा, अवंतीनगर शाखा (९३०९८६८७०५ व ९४२२४६०४२८), अपना बाझार (कासिमभाई) आय. टी.आय. विजापूर रोड (७९७२९०१५४९ व ९०११२३९४९४), कोहिनूर मार्केट (समीर फुलारी) सैफुल, नडगिरी पेट्रोल पंप  (९३७१५८३८७४), व्ही. एस. आगरवाल, फॉरेस्ट (९४२२३७०९१०), राजेंद्र गृह वस्तू भांडार, राजेंद्र बत्तुल, अशोक चौक (७३५०६१४४५५), अभिनव मार्केट, अबीब खलीफा, इंदिरानगर निर्मिती विहार (९४२१०२५५५२), व्हेजिटेबल जंक्शन भाजीपाला- श्रीनिवास पल्ली, भद्रावती पेठ, सोलापूर (९८५०९३१७९३), सुहास पल्ली, भद्रावती पेठ सोलापूर (७८४१८०८०४३). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com