Farming agricultural Business Export ban lifted of molasses Mumbai Maharashtra | Agrowon

मळीवरील निर्यातबंदी उठविली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

मुंबई : राज्यात ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे मद्य आणि मद्यार्क मागणीचे व्यवहार कमी झाले आहेत. त्यामुळे मळी उपलब्धतेत वाढ झाली आहे. त्यामुळे उसाच्या मळीच्या निर्यातीवरची बंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी (ता. २९) जारी करण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे मद्य आणि मद्यार्क मागणीचे व्यवहार कमी झाले आहेत. त्यामुळे मळी उपलब्धतेत वाढ झाली आहे. त्यामुळे उसाच्या मळीच्या निर्यातीवरची बंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी (ता. २९) जारी करण्यात आला आहे.

आधीच्या वर्षीच्या तुलनेत २०१९-२० या वर्षीचे मळीचे उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेपोटी राज्यात मळीच्या परराज्यात तसेच परदेशात निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. मळीचा तुटवडा झाल्यास त्याचे परिणाम देशी-विदेशी मद्य, ईएनए तसेच इथेनॉलनिर्मिती असणाऱ्या मद्यार्कांवरही होण्याची शक्यता असते.

१ नोव्हेंबर २०१९ ला राज्यातील साखर कारखान्यांमध्ये सुमारे ३ लाख मेट्रिक टन मळी शिल्लक होती. चालू वर्षी अंदाजापेक्षा जास्त म्हणजे सुमारे २४ लाख मेट्रिक टन मळीचे उत्पादन झाले. ९ जून २०२० ला साखर कारखान्यांकडे सुमारे ८ लाख ४७ हजार टन आणि आसवनींकडे ५ लाख ४३ हजार टन, अशी एकूण १३ लाख ९० हजार टन मळी शिल्लक आहे. तसेच, साखर आयुक्तांच्या अंदाजानुसार २०२०-२१ या साखर हंगामात अपेक्षित ९५० लाख टन उसाचे गाळप झाल्यास सुमारे ३६ ते ३८ लाख मळीचे उत्पादन अपेक्षित आहे.

मात्र, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मद्य आणि मद्यार्क मागणीचे व्यवहार कमी झाले आहेत. परिणामी, मळीच्या उपलब्धतेत वाढ झाली आहे. त्यामुळे ३० सप्टेंबर २०२० पर्यंत घालण्यात आलेली निर्यातबंदी २९ जूनच्या शासन निर्णयाद्वारे तातडीच्या प्रभावाने उठविण्यात आली आहे. मळी निर्यातीच्या परवानगीवर केंद्रीयरीत्या नियंत्रण ठेवण्यासाठी मळीनिर्यातीची परवानगी देण्याचे अधिकार आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांना देण्यात येत आहेत. याबाबत त्यांनी सविस्तर कार्यप्रणाली निश्चित करून निर्यातदार घटकांना निर्यातीची परवानगी द्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.


इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...