Farming agricultural Business farmers facing trouble at cotton procurement center Parbhani Maharashtra | Agrowon

परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत अडथळे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जून 2020

शुक्रवारी (ता.२९) संध्याकाळी बाजार समितीकडून संदेश आल्यानंतर दोन वाहनांमध्ये कापूस भरून शनिवारी (ता.३०) सकाळी पहाटे पाच वाजता मार्केट यार्डात आलो. दुपारी केंद्रावर रांग लागली. परंतु, मोजमाप न झाल्यामुळे मुक्काम पडला. चार हजार रुपये वाहन भाडेपट्टीसह मुक्कामी अडीच हजार रुपयांचा भुर्दंड बसला.
- गोविंद नवघरे,शेतकरी, कुंभारी, जि. परभणी.

परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी येथील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकरी संख्येवरून गोंधळाची स्थिती आहे. बाजार समितीचे ढिसाळ नियोजन, त्यात राजकीय नेतेमंडळी, बाजार समितीचे आजी, माजी पदाधिकारी, व्यापारी आदींचा हस्तक्षेप, यामुळे खरेदी प्रक्रियेत अडथळे येत आहेत. परिणामी सामान्य शेतकऱ्यांना मात्र मोजमापासाठी दिवसभर तिष्ठत थांबावे लागत आहे.

कापसाचे एका दिवसात मोजमाप होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मुक्काम पडत आहे. रस्त्यावर वाहनांची रांग लागत आहे. त्यामुळे सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी परभणी बाजार समिती अंतर्गतच्या गावातील शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात ऑफलाइन नोंदणी केली. अशा शेतकऱ्यांची संख्या तीन हजारांवर असल्याचे सांगितले जात आहे. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी एप्रिल महिन्यात ऑनलाइन पद्धतीने ७ हजार २३७ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. कापूस विक्रीसाठी घेऊन येण्यासाठी संदेश पाठविताना ऑफलाइन आणि ऑनलाइन नोंदणी केलेल्या १०० शेतकऱ्यांना दररोज बाजार समितीकडून संदेश पाठविले जात आहेत. ऑनलाइन नोंदणीपैकी कापूस खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या अद्याप ५०० च्या आतच आहे. मोजमाप, वाहनातील कापूस खाली करण्यास वेळ लागत आहे.

सहा जिनिंगमध्ये कापूस खरेदी केला जात आहे. परंतु, जिनिंग कारखाने बंद आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी कापूस साठविण्यासाठी जागा नाही. सकाळी एका जिनिंगवर खरेदी केली जाते. तेथील खरेदी बंद झाल्यानंतर दुपारी अन्य ठिकाणच्या जिनिंगवर वाहने नेण्यास सांगितले जाते. टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कापसाचे मोजमाप दिवसभरात होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दररोज ४० ते ५० शेतकऱ्यांना केंद्रावर मुक्काम करावा लागत आहे. त्यामुळे वाहन भाडेपट्टीसह मुक्कामी भाडे असा दुहेरी भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

संदेश न पाठविलेली वाहने रांगेत घुसवली जात आहेत. टोकन देण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी, ‘पणन’चे ग्रेडर यांच्यावर दबाव तंत्राचा अवलंब करत राजकीय कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी, व्यापारी विशिष्ट वाहनामधील कापसाच्या मोजमापासाठी आग्रह धरत गोंधळ घालत असल्याचे चित्र आहे. खरेदी प्रक्रियेतील अशा प्रकारच्या अडथळ्यांमुळे सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची वाहने मार्केट यार्डात आल्यानंतर त्यांना टोकन दिले जात आहे. ऑफलाइन अर्जांची छाननी सुरु आहे. जिनिंग संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे खरेदीत गती येईल,अशी माहिती बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर यांनी दिली.
 


इतर अॅग्रो विशेष
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...