Farming agricultural Business farmers weekly market starts Aurangabad Maharashtra | Agrowon

औरंगाबाद येथे शेतकरी आठवडे बाजार सुरु

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

जवळपास वीस मार्चपासून बंद पडलेले शेतकरी आठवडे बाजार ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून पुन्हा सुरू झाल्याने आम्हाला फळे ,भाजीपाला ,धान्य विक्रीची संधी मिळाली.
- विलास भेरे, कोनेवाडी, जि. औरंगाबाद.

औरंगाबाद  ः'कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बंद पडलेला शेतकरी आठवडे बाजार पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. परंतु आता हा बाजार सुरू करताना आता सोशल डिस्टन्स तसेच अन्य खबरदारीही घेतली जात आहे.

औरंगाबाद शहरात पणन व कृषी विभागाच्या समन्वयातून थेट शेतमाल विक्रीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यात आले होते. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर २० मार्चपासून महानगरपालिकेच्या क्षेत्रात जवळपास तीन ठिकाणी भरवण्यात येणारे हे बाजार गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर ग्राहक व किरकोळ खरेदीदारांची जाधववाडी बाजार समितीत फळे व भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होऊ लागली. ही गर्दी थांबवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांमार्फत ग्राहकांना फळे, भाजीपाला, धान्य विक्री करण्याचे नियोजन करण्यात आले.

जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकरी गटांनी त्या अनुषंगाने कृषी विभागाकडे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या फळे, भाजीपाला व धान्याची माहिती नोंदविली. त्यानंतर कृषी, महसूल व महानगरपालिका यांच्या समन्वयातून पुन्हा एकदा रविवारी (ता. २९) शेतकरी आठवडे बाजार सुरु करण्यात आला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसरातील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयासमोर हा शेतकरी आठवडे बाजार भरवण्यात आला.

या बाजारात येणाऱ्या शेतकरी व ग्राहकांसाठी हात धुण्याकरिता पाणी, साबण व हॅन्डवॉशची सोय करण्यात आली. याशिवाय सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी ग्राहकांकरिता सर्कल आखण्यात आले. मास्क, हँडग्लोजचा वापर शेतकरी व ग्राहक करीत होते. या आठवडे बाजारात रविवारी सकाळी आठ ते अकरा वाजेदरम्यान एक टनाच्या आसपास फळे व भाजीपाला विक्री झाली होती. जवळपास सहा शेतकरी गट विक्री प्रक्रियेत सहभागी झाले होते. आता अशाच प्रकारे नियमांचे पालन करून आठवड्यात बुधवारी दशमेश नगरमध्ये तसेच शुक्रवारी ज्योतीनगर येथेही शेतकरी आठवडे बाजार सुरू करणार असल्याची माहिती कोनेवाडी येथील शेतकरी गटाचे प्रमुख विलास भेरे यांनी दिली.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...