पुण्यात सेंद्रिय धान्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद

आत्माच्यावतीने आयोजित सेंद्रिय धान्य महोत्सवाची पाहणी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केली.
आत्माच्यावतीने आयोजित सेंद्रिय धान्य महोत्सवाची पाहणी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केली.

पुणे : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि पुणे कृषी विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजिलेल्या सेंद्रिय धान्य महोत्सवाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या हस्ते महोत्सवाचे गुरुवारी (ता.६) उद्‌घाटन झाले. राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर, फलोत्पादन संचालक शिरीष जमदाडे, गुणनियंत्रण संचालक विजयकुमार घावटे, जेडीए दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. जी. पलघडमल, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे उपस्थित होते.  

कृषिभवनाच्या आवारात भरलेल्या या महोत्सवात ४२ शेतकरी गटांनी सहभाग घेतला. प्रयोगशाळांमधून तपासणी केलेला सेंद्रिय शेतमाल विकत घेण्यास ग्राहकांनी पसंती दिली.

धान्य महोत्सवाला मुदतवाढ गुरुवारपासून (ता. ६) सुरू झालेल्या या धान्य महोत्सवाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ग्राहकांच्या आग्रहास्तव आज (ता. ९) महोत्सवाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत धान्य महोत्सव सुरू राहणार असून, प्रमाणित सेंद्रिय शेतमालच्या खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com