Farming agricultural Business grapes export starts to china Sangli Maharashtra | Agrowon

चीनला द्राक्ष निर्यात सुरू

अभिजित डाके
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

द्राक्ष निर्यातीवर ‘कोरोना’चा कुठलाही परिणाम नाही. मुळात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बागांना बसल्याने दर्जेदार माल तयार होण्यास विलंब झाला. त्यामुळे चीनला द्राक्ष निर्यात सुरू होण्यास विलंब झाला. सध्या चीनमधून द्राक्षाची मागणी वाढत असून, गेल्या वर्षीपेक्षा यंदा निर्यात अधिक होईल, असा अंदाज आहे. 
— संजय राऊत, द्राक्ष निर्यातदार

सांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे द्राक्ष हंगाम उशिरा सुरू झाल्याने चीनला होणारी निर्यातही उशिरा सुरू झाली. चीनमधून भारतीय द्राक्षाला मागणी वाढली आहे. सांगलीतून सध्या एक कंटनेर चीनला रवाना झाला असून, द्राक्षाला प्रतिकिलोस ८० ते १२० रुपये दर मिळाला. त्यामुळे द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यात अधिक होईल; तसेच, ‘कोरोना’चा द्राक्ष निर्यातीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दरवर्षी आगाप छाटणी घेतात. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्ष बाजारपेठेत येतात. दरवर्षी क्रिसमसला चीनचे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी सांगलीची द्राक्ष बाजारपेठेत जातात. त्यामुळे दरही चांगला मिळतो. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी छाटणी नियोजन करून दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेतात. वास्तविक पाहता, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महापूर आणि त्यानंतर अतिवृष्टीचा फटका आगाप छाटणी घेतलेल्या बागांना बसला. त्यातच सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टी झाली. त्यामुळे छाटणी वेळापत्रक पुढे गेले.

परिणामी जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम उशिरा सुरू झाला. त्याचा परिणाम निर्यातीवर झाला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष बाजारपेठेत आली खरी; परंतु बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाचा दर्जा चांगला नव्हता. त्यामुळे द्राक्षाची चीनला निर्यात होऊ शकली नाही. त्यामुळे कोरोनाचा फटका चीनच्या निर्यातीवर बसला, अशी चर्चा सुरू झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत होते. चीनला द्राक्षाची निर्यात सुरू होणार की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. 
गेल्या वर्षी हंगाम वेळेत सुरू झाला होता. २३ एप्रिलपर्यंत निर्यातीचा हंगाम सुरू राहिला होता. त्यामुळे सांगलीतून चीनला ५१ कंटनेर म्हणजे ३३.४६ टन निर्यात झाली होती. 

द्राक्षाला पोषक वातावरण
गेल्या चार ते पाच दिवसांपासून द्राक्षाला पोषक असे वातावरण निर्माण झाले असून द्राक्षाचा आकार आणि गोडी देखील वाढू लागली आहे. यामुळे चीनमधून द्राक्षाची मागणी वाढू लागली आहे. सध्या गतवर्षीपेक्षा चालू वर्षाच्या सुरुवातीलाच प्रतिकिलोस १० रुपयांनी दरात वाढ झाली असून ८० ते १२० रुपये दर मिळत आहेत. येणाऱ्या काळात दरात आणखी वाढ होईल. त्यातच यंदा हंगाम उशिरा सुरूर झाल्याने एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

उशिरा घेतलेल्या फळछाटणी झालेली द्राक्ष चीनला निर्यात करण्याची मोठी संधी आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने द्राक्ष निर्यातीसाठी पोषक आहे, असे कृषी अधिकारी  (निर्यात) डी. एस. शिलेदार यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...