नाशिक जिल्ह्यातील २७ हजारांवर द्राक्ष बागांची नोंदणी

अतिवृष्टीच्या तडाख्याने द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत कृषी विभागाने प्रयत्न करून ग्रेपनेट प्रणालीमध्ये बागांच्या नोंदणीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नोंदणीच्या आकडेवारीत वाढ होऊ शकली. - नरेंद्र आघाव,कृषी उपसंचालक, नाशिक.
 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ या प्रणालीअंतर्गत द्राक्षबागांची नोंदणी करण्यात येते. चालू हंगामासाठी १४ ऑक्टोबर २०१९ पासून ही नोंदणी सुरू झाली होती. त्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र अपेक्षित नोंदणी न झाल्याने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यादरम्यान जिल्ह्यातील २७ हजार ७९१ द्राक्षबागांची अंतिम नोंदणी झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चालू वर्षी मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. प्रतिकूल स्थिती असतानाही द्राक्ष निर्यातीसाठी ग्रेपनेट या संगणकीय प्रणालीवर द्राक्ष उत्पादकांनी बागांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. मागील वर्षीच्या (२०१८-१९) हंगामात विक्रमी ३८ हजार द्राक्षबागांची नोंदणी झाली होती. चालू वर्षी जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते, मात्र अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत २७ टक्के नोंदणी कमी झाली आहे. नोंदणीसाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह नाशिक जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने साह्य केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com