माण तालुक्यात दमदार पावसाने यंदा मधाचा गोडवा वाढला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कुकुडवाड, जि. सातारा  : माण तालुक्‍यात यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे पिकासह मुबलक पाण्यामुळे ठीकठिकाणी झाडाच्या फांद्यावर मधमाशांची पोळी वाढल्याचे दिसून येत आहे. तद्वत परतीच्या पावसामुळे तालुक्‍यात पिके चांगली बहरली असल्याने या परिसरातील मधाचा गोडवा चांगलाच वाढला आहे, असे जाणकार बोलत आहेत. शिवारात बहरलेल्या रब्बीच्या पिकांमुळे आणि मुबलक पाणीसाठ्यामुळे मधमाशांना मुबलक मकरंद मिळत आहे. त्यामुळे झाडे, वेली आणि दगडाला मोहळाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. 

मधमाशांसाठी सर्वात पोषक हंगाम हिवाळा ऋतू आल्याने मधमाशा सर्वत्र पोळे तयार करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सर्वत्र शेतशिवारात ज्वारी, गहू आणि हरबरा पिके भरात आल्याने मधमाशांना मुबलक प्रमाणात पाण्यासह मकरंद उपलब्ध होत आहे. परिणामतः मधमाशांची अधिकाधिक पोळी निर्माण होऊन मधमाशांच्या संख्येत वाढ झाली असल्याने मुबलक मध मिळत आसल्याचे दिसत आहे.

सध्या ज्वारीचे पीक बहरल्याने मुबलक मध मिळत असल्याने मधात गोडवा आहे, असं म्हटलं जात आहे. एकंदरीत गावरान मध अधिक चविष्ट आणि अधिक गोळा करणे सहज शक्‍य होणार आहे. मधामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे शहरात गावठी मधास मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. 

परागीभवनाचा शेतीस फायदा  निसर्गाचे चक्र अनेक घटकांवर अवलंबून असते. सध्या मधमाशांच्या परागीभवनाचा फायदा शेतीस होत आहे. स्त्री पुकेसराचे पूकेसरांशी मिलन घडवून आणण्याचे काम मधमाशा करतात. या क्रियेने फुलास चांगला बहर येऊन उत्पन्नात वाढ होते. फुले बहरण्यासाठी फुलांमधील पराग, मकरंद आणि मधमाशांच्या लाळेची प्रक्रिया होऊन मध तयार होतो. यामुळे ही प्रक्रिया शेतकऱ्यास लाभदायक ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे परिसरात सर्वत्र मधमाशांची पोळी दिसून येत आहेत. त्यामुळे यावर्षी मधाचा गोडवा वाढला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com