Farming agricultural Business Job guarantee scheme Status Mumbai Maharashtra | Page 3 ||| Agrowon

राज्यात ‘रोहयो’च्या कामांवर ६ लाख मजूर 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 मे 2020

मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन सुरु आहे. मात्र ‘कोरोना’चा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची ४६ हजार ५३९ कामे सुरु असून त्यावर ५ लाख ९२ हजार ५२५ मजूर उपस्थिती आहे. मजुरांमध्ये ‘कोरोना’चा प्रसार होणार नाही याची दक्षता घेऊन श्रमिकांना काम उपलब्ध करून दिले जात आहे, मागेल त्याला काम देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन सुरु आहे. मात्र ‘कोरोना’चा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची ४६ हजार ५३९ कामे सुरु असून त्यावर ५ लाख ९२ हजार ५२५ मजूर उपस्थिती आहे. मजुरांमध्ये ‘कोरोना’चा प्रसार होणार नाही याची दक्षता घेऊन श्रमिकांना काम उपलब्ध करून दिले जात आहे, मागेल त्याला काम देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

राज्यात १९ प्रकारच्या कामांसाठी शेल्फवर साधारणत: ५ लाख ८७ हजार ३६० कामे तयार ठेवण्यात आली आहेत. काम उपलब्ध करून देण्यामध्ये तीन विभाग आघाडीवर आहेत यामध्ये सर्वाधिक कामे ग्रामपंचायत क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ती ३६ हजार ०४६ आहेत. कृषी विभागाने ५५२९ कामे तर रेशीम संचालनालयाने १३२९ कामे उपलब्ध करून दिली आहेत. 

‘कोरोना’चा संसर्ग मनरेगाच्या कामांवरील मजुरांना होऊ नये, यादृष्टीने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. यामध्ये मनरेगाच्या कामांची मागणी प्राप्त झाल्यास प्राधान्याने वैयक्तिक स्वरूपाची कामे हाती घेणे, कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, साबण आदी उपलब्ध करून देणे, मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, अंतर ठेवून काम पूर्ण होईल याची काळजी घेणे यासारख्या सूचनांचा समावेश आहे. 

वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्टेधारक असलेल्या पात्र लाभार्थ्यांची मनरेगाअंतर्गत नोंद घेण्यात आली असून त्यांना जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकल जॉब कार्डधारकांची संख्या २२ लाख २६ हजार ८७८ इतकी आहे. एकल जॉबकार्डधारक म्हणजे ज्यांना कुणाचा ही आधार नाही असे नागरिक. त्यांना कामाच्या माध्यमातून आधार मिळावा म्हणून एकल जॉब कार्डधारकांना प्राधान्याने कामे उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 
 
भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक मजूर कार्यरत 
राज्यात ‘रोहयो’च्या कामांवर सर्वाधिक मजूर भंडारा जिल्ह्यात आहेत. तिथे १ लाख ३१ हजार ११८ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर ६२ हजार ८८९ मजूर आहेत. गोंदिया तिसऱ्या स्थानावर असून येथे ५६ हजार १९२ मजूर कार्यरत आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
वाद-प्रतिवादांचा खेळ अन् हतबल शेतकरीनिकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याच्या...
शेतकऱ्यांनो, एक वर्ष सुटी घ्यायची का?जगभरात जनुकीय सुधारित (जेनिटिकली मॉडिफाइड/जीएम)...
...अन्यथा कृषी सहसंचालकांना अटक करून...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात...
`गोसेखुर्द'चे भू-संपादन संपेनानागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा...
काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा ...अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत आत्तापर्यंत...
नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात...नगर  ः जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला...
दुग्धोत्पादकांना लिटरमागे १० ते १२...नगर ः अनेक शेतकऱ्यांसह बेरोजगारीवर मात करण्यासाठी...
धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोरपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात...
अमेरिकन लष्करी अळीचे मका पिकावर आक्रमणपुणे ः खरिपाची पेरणी होऊन महिना उलटत नाही तोच...
रासायनिक अवशेष काढण्यासाठी 'अर्का...नाशिक ः फळे आणि भाजीपाला पिकांवर रासायनिक...
देशात ९२ लाख हेक्टरवर कापूसमुंबई: देशात कापूस लागवडीने वेग घेतला आहे....
राज्यातील धरणांमध्ये २८ टक्के पाणीसाठापुणे : जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तसेच...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
`बॅलन्स`अभावी शेतकऱ्याला दिलेला चेक...अकोला ः अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई...
‘आपले सरकार’ पारदर्शकच हवेचालू खरीप हंगामासाठी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत...
शेती म्हणजे रोजगार हमी योजना आहे का?खूप दिवसांनंतर एका कार्यकर्ता मित्राचा फोन आला....
मराठवाड्यात कपाशीची ८० टक्के पेरणीऔरंगाबाद :  सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत...
सोयाबीन बियाणेप्रकरणी ३० हजार तक्रारी ः...यवतमाळ : सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात...
मुंबईसह उत्तर कोकणात जास्त, तर दक्षिणेत...पुणे : राज्याच्या विविध भागांत हलक्या ते...