Farming agricultural Business maize procurement status Sangli Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३ क्विंटल मका खरेदी

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

हमीभावाने मक्याची खरेदी अंतिम टप्प्यात आली आहे. १५ शेतकऱ्यांकडील मका खरेदी करणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांची मका खरेदी केली आहे. त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी वरिष्ठ विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. तो मंजूर झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होईल.                           - दिलीप पाटील, जिल्हा पणन अधिकारी, सांगली.

सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी चार खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी जत, आटपाडी, आणि तासगाव या तालुक्यांतील खरेदी केंद्रांवर १०३ शेतकऱ्यांनी २०२३ क्विंटल मक्याची विक्री केली असल्याची माहिती जिल्हा पणन विभागाच्या सूत्रांनी दिली.

शासनाने हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची विक्री होऊ नये आणि किमान आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. सध्या जिल्ह्यात मक्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी सांगली, आटपाडी, जत, आणि तासगाव या ठिकाणी चार केंद्रे सुरू केली आहेत. मका खरेदीची मर्यादा हेक्टरी २५९१ किलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मक्याला १७६० रुपये क्विंटल असा हमीभाव असल्याने ११८ शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर मका विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मका उत्पादकांना खरेदी केंद्रांवर मका विक्रीसाठी येण्याकरिता मोबाईलद्वारे संदेश पाठवण्यात आले आहेत.

सांगली येथील खरेदी केंद्रावर मका विक्रीसाठी नोंदणी झालेली नाही. तासगाव, आटपाडी आणि जत तालुक्यातील केंद्रांवर शेतकरी नोंदणी झाली आहे. आटपाडी तालुक्यातील ६२ शेतकऱ्यांनी १ हजार ११ क्विंटल, जत तालुक्यातील २१ शेतकऱ्यांनी ६४८, तर तासगाव तालुक्यातील २० शेतकऱ्यांनी  ३६४ क्विंटल मक्याची खरेदी केंद्रांवर विक्री केली आहे. अजून १५ शेतकऱ्यांनी मक्याची विक्री केलेली नाही. खरेदी केंद्रांवर मका विक्रीची हमीभावाप्रमाणे ३५ लाख ६० हजार ४८० रुपये इतकी रक्कम झाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यासाठी त्याचा प्रस्ताव वरिष्ठ विभागाकडे सादर करण्यात आला आहे. तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाईल.
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...