Farming agricultural Business maize procurement will start soon Buldhana Maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात लवकरच सुरू होणार शासकीय मका खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

बुलडाणा  ः मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मका खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यात २५ हजार मेट्रीक टन मका खरेदी करता येणार आहे. सदर मका खरेदी केंद्र जिल्ह्यात तत्काळ सुरू व्हावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे प्रयत्न करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून बुलडाणा जिल्ह्यात लवकरच शासकीय मका खरेदी केंद्र सुरू होणार आहे.

बुलडाणा  ः मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मका खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यात २५ हजार मेट्रीक टन मका खरेदी करता येणार आहे. सदर मका खरेदी केंद्र जिल्ह्यात तत्काळ सुरू व्हावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे प्रयत्न करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून बुलडाणा जिल्ह्यात लवकरच शासकीय मका खरेदी केंद्र सुरू होणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यात गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड केली होती. मक्याचे क्षेत्र १० हजार हेक्टरपेक्षा अधिक होते. उत्पादनही चांगले आले आहे. परंतु ‘कोरोना’मुळे बाजारात मक्याला एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याने मका उत्पादक अडचणीत सापडले होते. त्यामुळे शासनाने शासकीय आधारभूत किमतीनुसार मका खरेदी करावी, अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यांकडून होत होती.

याचीच दखल घेत केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राज्यात या खरेदीला परवानगी देण्यात आली आहे. सदर खरेदी केंद्र जिल्ह्यात तत्काळ सुरू करावे यासाठी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. म्हसे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यास संबधित यंत्रणेला आदेश दिले असून जिल्ह्यात लवकरच शासकीय मका खरेदी केंद्र सुरू होणार आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...