Farming agricultural Business market committee start again Nashik Maharashtra | Page 3 ||| Agrowon

नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु; नियमितच्या तुलनेत अवघी २० टक्के आवक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कामकाज तीन दिवस बंद होते. मात्र स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण होऊन शुक्रवारपासून (ता.२९) बाजार समिती पुन्हा सुरु झाली. बाजारसमितीत शुक्रवारी नियमित आवकेच्या तुलनेत आवक अवघी २० टक्के होती. तसेच बाजारसमितीत फारशी गर्दी नसल्याचेही दिसून आले. नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या काटेकोर सूचनांचे पालन करीत बाजार समितीचे संपूर्ण व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत.

नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कामकाज तीन दिवस बंद होते. मात्र स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण होऊन शुक्रवारपासून (ता.२९) बाजार समिती पुन्हा सुरु झाली. बाजारसमितीत शुक्रवारी नियमित आवकेच्या तुलनेत आवक अवघी २० टक्के होती. तसेच बाजारसमितीत फारशी गर्दी नसल्याचेही दिसून आले. नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या काटेकोर सूचनांचे पालन करीत बाजार समितीचे संपूर्ण व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत.

बाजार समितीचे कामकाज २६ ते २८ मे दरम्यान बंद राहिल्याने सुमारे १२ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. यानंतर नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे यांना काही नियमांबाबत सूचना दिल्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले आहे. मात्र पेठ रोडवरील शरदचंद्र पवार बाजार आवारात रात्रीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व पंचवटी आवारातील किरकोळ व्यवहार बंद राहणार आहेत. बाजारात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी वाहनाबरोबर शेतकऱ्यासह एकाच व्यक्तीला प्रवेश देण्यात आला.
बाजार आवारात येणारे अडते, व्यापारी व हमाली कामगार या घटकांना ओळखपत्राशिवाय प्रवेश नाकारण्यात आला. फक्त शेतीमालाचे लिलाव सुरू असून किरकोळ विक्री बंद केली आहे.त्यामुळे किरकोळ खरेदीदारांना प्रवेश देण्यात आला नाही.

तसेच अनधिकृत इसम अथवा फेरीवाले यांना प्रवेशास मनाई करण्यात करण्यात आली आहे. आवारात प्रवेश करताना संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली जात असून लहान मुले व वृद्धांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसेच प्रत्येकाला रुमाल व मास्क बंधनकारक असून गेटवर येताना प्रत्येकाचे तापमान तपासूनच बाजार समिती आवारात प्रवेश देण्यात येत आहे.

ज्या शेतकऱ्यांना किरकोळ पद्धतीने शेतीमाल विकायचा आहे, त्यांना तो महानगरपालिका प्रशासनाने शहरात ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रावरच विकता करता येईल,असे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी शेतमाल अडत्यांकडे विकावा, जे शेतकरी किरकोळ शेतमाल विकतील त्यांचा शेतमाल जप्त करण्यात येईल, किरकोळ शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


इतर अॅग्रो विशेष
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्यापासून...औरंगाबाद ः कृषी निविष्ठा  विक्रेत्यांच्या...
सफरचंद झाडाला फळधारणा ! नाशिकच्या...नाशिक : जिल्हा फलोत्पादन व विविध प्रयोगात आघाडीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या...
एकाच आॅनलाइन अर्जावर कृषी योजनांचा लाभ...मुंबई  : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
लातूर जिल्ह्यात पोलिसांनी बांधावर जात...लातूर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या...
न्यायालयाच्या भूमिकेनंतर गुणनियंत्रण...पुणे  : बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
वाद-प्रतिवादांचा खेळ अन् हतबल शेतकरीनिकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याच्या...
शेतकऱ्यांनो, एक वर्ष सुटी घ्यायची का?जगभरात जनुकीय सुधारित (जेनिटिकली मॉडिफाइड/जीएम)...
...अन्यथा कृषी सहसंचालकांना अटक करून...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात...
`गोसेखुर्द'चे भू-संपादन संपेनानागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा...
काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा ...अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत आत्तापर्यंत...