साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी राहतेय शिल्लक

सातारा : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही गावांत खासगी दूध संकलकांना दूध संकलन करू दिले जात नाही. त्यामुळे दूध मुबलक असूनही त्याचे संकलन होत नसल्याने शहरी भागाला दूध टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात तब्बल ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी शिल्लक राहात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही गावांत खासगी दूध संकलकांना दूध संकलन करू दिले जात नाही. त्यामुळे दूध मुबलक असूनही त्याचे संकलन होत नसल्याने शहरी भागाला दूध टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात तब्बल ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी शिल्लक राहात आहे.

जिल्ह्यात सहा सहकारी दूध संघ, ६६ खाजगी दुध प्रकल्प तर तीन मल्टिस्टेट दुध संघाद्वारे दुध संकलन केले जाते. सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. तब्बल ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी शिल्लक राहात आहे. तसेच ग्रामीण भागात खासगी दूध संघांकडून होणारे संकलन एक दिवसाआड होत असल्याने शहरी भागातील नागरिकांना दुधाच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ग्रामीण भागात दुधाचे संकलन होऊन ते पुण्या-मुंबईकडे पाठविले जात होते. तेही आता थांबलेले आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरांत दूध अपुरे पडू लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर विभागीय आयुक्तांनी दूध संकलन सुरू ठेऊन शासननिर्णयाप्रमाणे दर देण्याच्या सूचना केली आहे. पण दूध शिल्लक राहात असल्याने अडचण निर्माण झाली आहे. कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात दूध पावडर तयार करून ठेवलेली आहे. त्यामुळे तेही दूध घेत नाहीत. तसेच दूध साठवण्याचे प्रकल्प एक दिवसाआड बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आता एक दिवसाआड दूध संकलन केले जात आहे. दुसरीकडे गावातच मागणी वाढल्यामुळे डेअरीला दूध घालण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी होऊ लागला आहे. त्यामुळे शहराकडे येणारे दूध कमी झाले असून, सध्या ६५ हजार लिटरने दूध संकलन कमी झाले आहे.

दूध संकलन करणाऱ्या गाड्यांना काही गावांत ‘कोरोना’च्या भीतीने संकलन करून दिले जात नाही. तसेच खासगी दूध संकलक कमी दराने म्हणजेच ३० रुपये प्रति लिटरप्रमाणे दूध खरेदी करत असल्याचे बोलले जात आहे. गावात पुणे, मुंबईहून मोठ्या प्रमाणात आलेल्या स्थानिक नागरिकांमुळे दुधाला गावातच मागणी वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणारे खासगी दूध संघांचे दूध कमी झाले आहे. परिणामी दूध संकट वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याला खासगी व सहकारी दूध संघांसह दूध उत्पादकांनीही साथ दिली तरच दूधाचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील दुधाची स्थिती

  • जिल्ह्याचे दूध संकलन : सहा लाख ८५ हजार १००
  •  बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे दूध : पाच लाख ७८ हजार ४००
  • एकूण संकलन : १२ लाख ६३ हजार ५००
  • एकुण वितरण ः ११ लाख ९७ हजार ९००
  • शिल्लक ः ६५ हजार ६००
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com