Farming agricultural Business modern goat meat export center will establish at Nagpur Maharashtra | Agrowon

नागपुरात होणार आधुनिक बोकड मांस निर्यात केंद्र : पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

टाळेबंदीनंतर सेवा, उद्योग, व्यापार या क्षेत्रांच्या वाढीसाठी मोठा कालावधी जाऊ शकतो. मात्र, कृषी आणि कृषी पूरक क्षेत्र यातून लवकर गती घेईल. राज्य शासन केंद्र शासनाकडे शेळीपालनासाठी (गोट फार्मिंग) दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवत असून, यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाची समान भागीदारी असेल.

- सुनील केदार, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री.

नागपूर : पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून कृषिपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी नागपुरातून बोकड मांस निर्यात केले जाणार आहे. यासाठी अद्ययावत सुविधा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी दिली. 

मिहान येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी (मिहान) प्रकाश पाटील, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. के. एस. कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन आरोग्य अधिकारी डॉ. ए. जी. ठाकरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, कस्टम विभागाचे विवेक सिरीह, बाजार समितीचे राजेश भुसारी, कार्गोचे यशवंत सराटकर, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर या वेळी उपस्थित होते.  

या वेळी श्री. केदार म्हणाले, की ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली टाळेबंदी संपल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन हा महत्त्वपूर्ण विभाग ठरणार आहे. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण असून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने जोडले गेले आहे. आतापर्यंत विदर्भासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात येथील बोकड मांस हैदराबाद येथून निर्यात केले जात होते. मात्र, आता नागपुरातूनच बोकड मांस विदेशात निर्यात केले जाणार आहे.

भविष्यात नागपूर हे बोकड मांस निर्यातीचे मोठे केंद्र होणार असून, कळमना बाजार समितीमध्ये पशुधनासाठी अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त केंद्र उभारण्यात येणार आहे. निवारा केंद्र आणि विमानतळ असे दोन ठिकाणी निर्यातीपूर्वी पशुधनाची तपासणी करणारे हे देशातील पहिले केंद्र असेल. त्यासाठी पशुसंवर्धन विभागातील शेळीपालन महामंडळाकडील आवश्यक निधी तत्काळ दिला जाईल.

कस्टम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बोकड कापणी, पॅकेजिंग व विक्री आदीबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करून मांस निर्यात केली जाईल. निर्यातीसाठी आवश्यक सर्व तपासण्या कळमना मार्केट आणि विमानतळावर केल्या जातील. देशातील इतर विमानतळांच्या तुलनेत नागपूर येथून जास्त निर्यात होणार आहे, असे श्री. केदार यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...