Farming agricultural Business nationalized banks do not give crop loan to farmers Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांचा हात आखडताच

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जून 2020

खरिपाच्या तोंडावर बॅंकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज देणे गरजेचे आहे. ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता व मागील कर्जमाफीचा विचार करता विनाअट कर्ज देणे गरजेचे असताना बॅंका कर्जवाटपाकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकार कर्जवाटप करा असे सांगत असताना कर्ज वितरण होत नाही. याबाबत आम्ही आवाज उठवणार आहोत. 
- बाळासाहेब पटारे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना. 
 

नगर  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज पुरवठ्याकडे यंदा बॅंकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता.५) ५४३ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. गेल्यावर्षी आत्तापर्यंत जवळपास ४० टक्क्यांपर्यंत कर्जवाटप झाले होते. उद्दिष्टाचा विचार करता आत्तापर्यंत सुमारे १६ ते १७ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टाच्या ३४ टक्के कर्ज वाटप केले असले तरी या बॅंकेचीही कर्जवाटपात गतवर्षीच्या तुलनेत उदासीनता दिसून येत आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीककर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. या बॅंकांना १९१२ कोटींचे उद्दिष्ट असताना आत्तापर्यंत केवळ ८३ कोटींचे पीककर्ज वितरित केले आहे.

नगर जिल्ह्यात यंदा खरीप, रब्बीसाठी ५ लाख ७८ हजार ५१२ शेतकऱ्यांसाठी ५२५० कोटी ४५ लाख रुपये कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यंदा खरिपासाठी ३ लाख ७४ हजार ४२८ शेतकऱ्यांना ३ हजार ४१० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे नियोजन आहे. मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बॅंकांमध्ये बहुतांश कामकाज बंद असल्याने कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत जिल्हा बॅंकेने ४१ हजार ९४१ शेतकऱ्यांना ४५९ कोटी ३० लाख तर राष्ट्रीयीकृत बॅंकांनी १९१२ शेतकऱ्यांना ८३ कोटी ७७ लाखांचे पीककर्ज वाटप केले असल्याची माहिती अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक एस.एम. वालावलकर यांनी दिली. राष्ट्रीयीकृत व खाजगी २७ बॅंकापैकी ११ बॅंकांनी आत्तापर्यंत एकही रुपया वितरित केलेला नाही. त्यामुळे ऐन खरिपात कर्ज न मिळाल्याने खते, बियाणांसह अन्य साहित्य खरेदी करण्याला अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

नगर जिल्ह्याची स्थिती 

  • खरिपातील पीककर्ज वाटप उद्दिष्ट  : ३४१० कोटी रुपये
  • शेतकरी संख्या : ३ लाख ७४ हजार ४२८ 
  • ५ जूनपर्यंत कर्जवाटप  : ५४३ कोटी रुपये
  • कर्ज वाटप केलेले शेतकरी  :  ४३ हजार ८५३ 
  • कर्ज वाटपाची टक्केवारी  :  १६

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...