संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
बाजारभाव बातम्या
घोडेगाव उपबाजारात नव्या कांद्याला ११ हजार रुपये दर
सोनई, जि. नगर : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (ता. १४) नवीन लाल कांद्याची १५,२०० गोण्या आवक झाली. या लिलावात जुन्या गावरान कांद्याची एकही गोणी आवक झाली नाही. नवीन एक नंबर कांद्यास कमाल ११ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. या उपबाजारात नव्या लाल कांद्यास २०० ते ११ हजार रुपये क्विंटल असा दर होता. शनिवारच्या लिलावातून तीन कोटी ६८ लाखांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

शनिवारी सकाळी बारा वाजता बाजारात लिलाव सुरू झाला. व्यापारी व अडतदार जुन्या गावरान कांद्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, कुणाकडेच तो शिल्लक राहिला नसल्याने शनिवारी प्रथमच जुन्या गावरान कांद्याची एकही गोणी लिलावात पाहण्यास मिळाली नाही. नवीन एक नंबर लाल कांद्यास कमाल ११ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. दोन नंबरला ४५०० ते ५५०० रुपये तर तीन नंबरच्या कांद्यास १५०० ते २००० हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला.
मागील एक महिन्यात येथील कांदा लिलावातून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाल्याने शनिवारी जिल्ह्याबाहेरून येथे कांदा आला होता. आमदार शंकरराव गडाख यांची नेहमी शेतकरीहिताची भूमिका असल्यानेच येथील जनावरांचा बाजार व आता कांदा लिलाव राज्यात नावारूपास येत आहे. येथील लिलाव पद्धत अनेक बाजार समित्यांमध्ये सुरू होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
- 1 of 65
- ››