रुईच्या टक्केवारीनुसार कापूस दर देण्याचा प्रयोग हिंगणघाटमध्ये सुरू

हिंगणघाट बाजारसमितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी संयंत्राचे लोकार्पण करताना.
हिंगणघाट बाजारसमितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी संयंत्राचे लोकार्पण करताना.

वर्धा  ः कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेत त्याआधारे कापसाला दर देण्याच्या देशातील पहिल्या प्रयोगाची मुहूर्तमेढ मंगळवारी (३१ डिसेंबर) हिंगणघाट बाजार समितीत रोवली गेली. बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते या निमित्ताने मिनी सयंत्रावर जिनिंग करून कापसातील रुईची टक्‍केवारी काढून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.

२०१५-१६ मध्ये कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेऊन दर देण्याचा पहिला प्रयोग वर्धा जिल्ह्यात करण्यात आला होता. त्या वेळी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये क्‍विंटल दर मिळाला. ३७ ते ४२ टक्‍के कापसाचे प्रमाण कापूस वाणात होते. हाच धागा पकडत कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीजचे प्रशांत मोहता, ओम दालिया, ‘सिरकॉट’चे डॉ. शुक्‍ला, ॲग्रोप्लस फाउंडेशनचे अध्यक्ष गोविंद वैराळे यांच्या माध्यमातून राज्यात कापूस व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगणघाट बाजार समितीकडे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्याची विनंती करण्यात आली. या प्रकल्प अंमलबजावणीस संचालक मंडळाने मान्यता दिली. त्यानंतर मंगळवारपासून उपक्रमाला सुरुवात झाली.

या वेळी डॉ. एस. के. शुक्ला, शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. घाडगे, एस. एस. कौटकर, डॉ. के. पांडियान, गोविंद वैराळे, प्रशांत मोहता उपस्थित होते. ‘सिरकॉट’चे संचालक डॉ.पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीला तीन मिनी जिनिंग यंत्रे पुरविण्यात आली आहेत. अवघ्या एक अश्वशक्तीवर ते चालतात. 

रुईचे प्रमाण असे मोजतात एक किलो कापूस जिनिंग केल्यास त्यातून ३४ किलो रुई आणि ६६ किलो सरकी मिळते. रुईचा दर १२० रुपये किलो तर सरकीचा दर अवघा २० रुपये किलो आहे. त्यामुळे एक टक्‍का जरी रुईचे प्रमाण वाढले तर सरासरी १०० रुपये वाढीव मिळतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com